शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 07:10 IST

National Highways Toll Pass: प्रवास अधिक स्वस्त, जलद; कार, जीप, व्हॅनसाठी मिळणार सुविधा, २०० वेळा करता येणार वापर

नवी दिल्ली: कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगरव्यावसायिक वाहनांसाठी ३ हजार रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली. या पासद्वारे राष्ट्रीय महामार्गावरून संपूर्ण देशात प्रवास करता येऊ शकेल. तीन हजार रूपये खर्च करून ७ हजार रूपयाचा टोल वाचविता येईल अशी योजना गडकरी यांनी आणली आहे. १५ ऑगस्टपासून हा पास सुरू होईल. याची मुदत १ वर्ष किंवा २०० खेपा यांपैकी जे आधी पूर्ण होईल, तेवढी असेल. या पासमुळे राष्ट्रीय महामार्गावर केवळ १५ रुपये एवढाच टोलखर्च सामान्यांना येईल.

पास कुठे मिळेल, आधीच्या फास्टॅगचे काय? वार्षिक पासविषयी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे...

वार्षिक पास कुठे खरेदी करू शकतो?राजमार्ग यात्रा मोबाइल अॅप आणि एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइटवर. 

वार्षिक पास कसा चालू होईल ?फास्टॅग आणि संबंधित वाहनाची पात्रता तपासल्यानंतर सक्रिय केला जाईल. यानंतर वापरकर्त्याला राजमार्ग यात्रा अॅप किंवा एनएचएआय वेबसाइटवर ३ हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करावा लागेल. त्यानंतर पास सुरू होईल.

माझ्याकडे आधीपासून फास्टॅग असल्यास, नवीन घ्यावा लागेल का? नाही, सध्याच्या फास्टॅगवरच पास मिळेल.

हा पास कोणत्या टोलवर चालेल?फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगतीमार्गावरील टोल नाक्यांवर लागू होतो. राज्य महामार्ग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवले जाणारे टोल नाके यावर पास लागू होणार नाही. अशा ठिकाणी फास्टॅग नियमित टोलप्रमाणेच असेल.

पास सर्व वाहनांसाठी आहे का?नाही. हा पास फक्त खासगी, बिगरव्यावसायिक कार/जीप/व्हॅन यांच्यासाठी आहे. व्यावसायिक वाहनात वापर झाल्यास पास त्वरित निष्क्रिय केला जाईल.

मी हा पास दुसऱ्या वाहनावर वापरू शकतो का?नाही. या पासचे हस्तांतर करता येणार नाही. केवळ संबंधित फास्टेंग असलेल्या नोंदणीकृत वाहनावरच वैध आहे.

फास्टॅग गाडीच्या समोरील काचेला लावणे आवश्यक आहे का?होय. काचेला योग्यरित्या लावलेल्या फास्टॅगवरच पास सक्रिय केला जाईल. जर माझा फास्टंग फक्त चेसिस नंबरवर नोंदणीकृत असेल तर काय? तर पास मिळणार नाही. पाससाठी वैध वाहन नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.

२०० टोल कसे मोजणार?पॉइंट-आधारित टोल नाके: एका टोल नाक्यावरून गेले की एक प्रवास मानला जाईल. पुढे-पाठीमागे (राउंड ट्रिप) केल्यास दोन प्रवास समजले जातील. क्लोज्ड टोलिंग प्रणाली: एक प्रवेश व एक निर्गम (एंट्री एक्झिट) म्हणजे एक प्रवास मानला जाईल.

पासबाबत एसएमएस येईल का?होय. पास सक्रिय करताना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस येईल. वर्ष संपण्याआधी २०० टोल झाल्यास ? वर्ष संपण्याआधी २०० टोल झाल्यानंतर पुन्हा २०० टोलसाठी किंवा वर्षभरासाठी पास खरेदी करू शकता.

स्टेट हायवे, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे येथे हा वार्षिक पास चालेल का?नाही. दोन्ही मार्ग राष्ट्रीय महामार्ग नाहीत. त्यामुळे तिथे हा पास चालणार नाही. पण जुना मुंबई-पुणे हाय-वे हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तिथे हा पास चालेल. स्टेट हाय-वेवर हा पास चालणार नाही.

नितीन गडकरी काय म्हणाले?"एका नाक्यावर सरासरी ५० रुपये द्यावे लागत असतील आणि २०० वेळा टोल भरावा लागला तर त्याची किंमत १०,००० रुपये होते. आता यातील वर्षाकाठी सात हजार रुपयाची बचत होईल", असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाFastagफास्टॅगNitin Gadkariनितीन गडकरी