नितीन गडकरींना १० हजारांचा दंड

By Admin | Updated: December 21, 2014 02:31 IST2014-12-21T02:31:57+5:302014-12-21T02:31:57+5:30

दिल्लीच्या एका न्यायालयाने मानहानीच्या एका खटल्यात न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १० हजारांचा दंड ठोठावला.

Nitin Gadkari gets 10 thousand penalty | नितीन गडकरींना १० हजारांचा दंड

नितीन गडकरींना १० हजारांचा दंड

नवी दिल्ली : दिल्लीच्या एका न्यायालयाने मानहानीच्या एका खटल्यात न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १० हजारांचा दंड ठोठावला. महानगर दंडाधिकारी गोमती मनोचा यांनी, गडकरींनी सुनावणीच्या तीन दिवस आधी शपथपत्र दाखल करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नव्हते, असे सांगितले. हे शपथपत्र केजरीवाल यांच्या वकिलांना तीन दिवसांपूर्वी देणे आवश्यक असताना ते शनिवारी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. दंडाधिकाऱ्यांनी गडकरींवर १० हजारांचा दंड ठोठावला असून या खटल्याची पुढील सुनावणी २४ मार्च रोजी निश्चित केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Nitin Gadkari gets 10 thousand penalty