शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 18:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक झाली.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक झाली. नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 2024पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य ठरवलं आहे. मोदी म्हणाले, हे आव्हानात्मक आहे. परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे मंत्र पूर्ण करण्यात नीती आयोगाची महत्त्वाची भूमिका आहे. उत्पन्न आणि रोजगार वाढवण्यासाठी निर्यात क्षेत्रालाही चालना देण्याची गरज आहे.नीती आयोगाच्या बैठकीला संबोधित करताना मोदी म्हणाले, 2024पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 34,94,00,00 कोटी रुपये करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हे लक्ष्य आव्हानात्मक आहे, परंतु राज्य सरकारांच्या मेहनतीनं ते गाठू शकतो, राज्यांनी आपापली आर्थिक क्षमता ओळखली पाहिजे. जीडीपीचा टार्गेट वाढवण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी जिल्हा स्तरावर काम करण्याची गरज आहे. देश कामगिरी, पारदर्शकता आणि वितरण प्रणालीच्या मार्गावर चालला आहे. त्यामुळेच योजना गरिबांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. गव्हर्निंग काऊंसिलनंही एका अशा सरकारी व्यवस्थेचं निर्माण करावं, त्याच्यावर लोकांचा विश्वास बसेल, असंही मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी पाण्याचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे.जलसंधारण मंत्रालयानंही पाण्याचा वापर आणि त्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आहे. जल संरक्षण आणि जल नियोजन संबंधित प्रयत्न एकाच स्तरावर झाले पाहिजेत, यासाठी केंद्रीय जलसंधारण मंत्रालयानं प्रयत्न केले पाहिजेत. देशात उपलब्ध असलेल्या पाण्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. 2024पर्यंत देशातल्या प्रत्येक गावात पाइपलाइननं पाणी पोहोचवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. नक्षलवादासंदर्भातही मोदींनी या बैठकीत भूमिका स्पष्ट केली आहे.हिसेंला आता चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. ज्या राज्यांनी आतापर्यंत आयुष्यमान भारत योजना लागू केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती कार्यान्वित करावी. तसेच त्यासाठी केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा करावी, असंही मोदी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी