एनआयटी काश्मीरबाहेर हलवण्याची मागणी फेटाळली
By Admin | Updated: April 10, 2016 02:10 IST2016-04-10T02:10:54+5:302016-04-10T02:10:54+5:30
एनआयटी (राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) श्रीनगरमध्ये शिकणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांची ही संस्था काश्मीरबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळली.

एनआयटी काश्मीरबाहेर हलवण्याची मागणी फेटाळली
श्रीनगर : एनआयटी (राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) श्रीनगरमध्ये शिकणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांची ही संस्था काश्मीरबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळली. पण मूळ मुद्यांवर विचार करण्याचे आश्वासन मात्र
त्यांना दिले.
एनआयटीत शिकणाऱ्या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या एका गटाने शुक्रवारी रात्री येथे जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग आणि शिक्षण मंत्री नईम अख्तर यांच्यासह मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन संस्थेतील विद्यमान परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा केली. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी संस्था स्थलांतरणाची मागणी फेटाळली असली तरी संस्थेतील शैक्षणिक वातावरणात सुधारणा घडवून आणण्यासह त्यांच्या इतर मागण्यांवर
विचार करण्याचे आश्वासन दिले
आहे. (वृत्तसंस्था)