शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

निर्मला सीतारामन यांनी स्विकारला संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार; संरक्षणमंत्रिपदी निवड झालेल्या दुसऱ्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 14:51 IST

संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर निर्मला सितारामन यांनी गुरूवारी सकाळी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

ठळक मुद्देसंरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर निर्मला सितारामन यांनी गुरूवारी सकाळी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत निर्मला सीतारामन यांनी संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.

नवी दिल्ली, दि. 7-  तीन सप्टेंबर मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं.  पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करताना निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर निर्मला सितारामन यांनी गुरूवारी सकाळी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत निर्मला सीतारामन यांनी संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. माजी केंद्रीय मंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळासाठी अरूण जेटली यांच्याकडे संरक्षण विभागाची धूरा देण्यात आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात निर्मला सीतारामन यांची संरक्षण मंत्रिपदी नियुक्ती झाली.  पण त्याच दिवशी संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त पदभार सांभाळणारे अरुण जेटली जपान दौऱ्यावर जाणार असल्याने सीतारामन यांनी तेव्हाच पदभार स्वीकारला नव्हता. जपान दौऱ्याची सर्व तयारी झाली असल्याने ऐनवेळी हा दौरा रद्द करणं योग्य नसल्यानं सीतारामन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. 

संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी या अधिकाऱ्यांशी थोडक्यात संवाद साधला. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. याआधी इंदिरा गांधी यांनी 1975 साली काही काळ आणी 1980 ते 1982 या काळात देशाचं संरक्षण मंत्रालय सांभाळलं होतं. अरूण जेटली जापान दौऱ्यावर असल्याने निर्मला सीतारामन यांनी आत्तापर्यंत संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारला नव्हता.

पक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेशिवाय हे शक्य नाही - निर्मला सीतारामनपक्षनेतृत्वाचा विश्वास आणि देवाच्या कृपेने मला इतक्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली आहे', अशी भावना देशाच्या नव्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली. मी भारावून विनम्र झाले. ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकून विश्वास दाखविल्याबद्दल मी पंतप्रधानांची ऋणी आहे. जे सतत मनात येते त्याचा मी आता देशसेवेसाठी उपयोग करू शकेन. एका लहानशा शहरातून आलेल्या आणि नेतृत्वाच्या पाठिंब्याने पक्षात विविध पदांवर काम केलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर एवढी मोठी जबाबदारी टाकली जाते तेव्हा वाटते की, खरंच ही वैश्विक कृपा आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पासून मोदीजींच्या कार्यशैलीशी मी परिचित आहे. महिलाही तेवढ्याच क्षमतेने काम करू शकता, त्यांना त्यांचा योग्य वाटा द्यायला हवा, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. शपथविधी सोहळ्यानंतर सीतारामन यांनी माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. 

कोण आहेत निर्मला सीतारामन?निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ आँगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. तामिळनाडूमध्ये बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीमधील जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. तेथे एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक त्यांनी मिळवला. परराष्ट्र संबंधात पी. एचडी पदवी मिळवल्यावर त्यांनी प्राइसवाँटर कूपर्स आणि बीबीसीमध्ये काही काळ काम केले. निर्मला सीतारामन राष्ट्रीय महिला आयोगाच्याही सदस्या होत्या. आंध्र प्रदेशातील प्रणवा स्कूलच्या संस्थापक सदस्या आहेत. 2006  साली त्या भाजपाच्या प्रवक्तेपदी निवडल्या गेल्या. उत्तम इंग्लिश, सफाईदार मुद्दे मांडणे यामुळे त्या भाजपाची इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर बाजू मांडणाऱ्या  प्रवक्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. २०१४ साली त्या केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या राज्यमंत्री झाल्या. त्या सध्या कर्नाटकमधून राज्यसभेत निवडून गेल्या आहेत.