निरगुडेच्या सरपंचपदी वसंत क
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:45+5:302015-08-26T23:32:45+5:30
ाजळे

निरगुडेच्या सरपंचपदी वसंत क
ा ळेउपसरपंचपदी ब्रम्हदेव केकाणशेटफळगढे । दि. २६ (वार्ताहर): निरगुडे ( ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी वसंत काजळे यांची तर उपसरपंच पदी ब्रम्हदेव केकाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच पदासाठी वसंत काजळे आणि चैत्राली सोनवणे यांनी अर्ज दाखल केले. तर उपसरपंच पदासाठी ब्रादेव केकाण व रमेश रणधीर यांनी अर्ज दाखल केले. मात्र माघारी च्या वेळी रमेश रणधीर यांनी अर्ज मागे घेतल्याने केकाण यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. मात्र सरपंच पदासाठी मात्र दोन अर्ज आल्याने निवडणूक झाली. काजळे यांना सहा तर सोनवणे यांना तीन मते मिळाली. त्या सरपंच पदी वसंतराव काजळे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दरेकर यांनी जाहीर केले. यावेळी तलाठी शिवराज देसटवाड, गामसेवक बडे, यांच्या सह सदस्य कविता केकाण, माऊली काजळे , आलका केजळे, सीताबाई लकडे, नंदा खंडाळे आदी उपस्थित होते------------------