शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

...मग आमच्या अधिकारांचं काय? दोषींना मुदत मिळताच निर्भयाच्या आईचा सवाल; अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 18:01 IST

निर्भया प्रकरणातील दोषींना न्यायालयाकडून ७ जानेवारीपर्यंतची मुदत

नवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ७ जानेवारीपर्यंतची मुदत मिळाली आहे. पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी दोषींना ७ जानेवारीपर्यंतचा कालावधी दिला. दया याचिकेसारखे पर्याय निवडण्यासाठी न्यायालयाकडून दोषींना मुदत दिली जाताच निर्भयाच्या आईनं टाहो फोडला. त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत. मात्र आमचं काय? आमच्या अधिकारांचं काय? असे प्रश्न त्यांनी साश्रू नयनांनी उपस्थित केले. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारपैकी एका आरोपीची (अक्षय) पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या अध्यक्षेताखालील खंडपीठानं अक्षयची याचिका फेटाळताना ती अन्य दोषींनी दाखल केलेल्या याचिकांसारखीच असल्याचं म्हटलं. निर्भया प्रकरणातील इतर आरोपींनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका न्यायालयानं २०१८ मध्येच फेटाळल्या आहेत. अक्षय कुमार सिंहच्या वकिलांनी दिल्लीतील प्रदूषण आणि खराब हवेचा हवाला देतानाच, फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, अशी विनंती केली होती. त्यावर कोणत्याही परिस्थितीत या गुन्ह्यात माफी दिली जाऊ शकत नाही आणि दोषींना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं होतं. निर्भया प्रकरणातील आणखी एक दोषी विनयच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींनी अद्याप निर्णय दिलेला नाही. दया याचिकेशिवाय फाशी होऊ शकत नाही. अक्षय कुमार सिंहसुद्धा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतो, असं न्यायमूर्तींनी म्हटलं.  

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय