आणखी दोघांच्या फाशीला स्थगिती निर्भया बलात्कार प्रकरण

By Admin | Updated: July 15, 2014 03:25 IST2014-07-15T03:25:03+5:302014-07-15T03:25:03+5:30

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन दोषींच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे

Nirbhaya rape case adjourned for two more hanging | आणखी दोघांच्या फाशीला स्थगिती निर्भया बलात्कार प्रकरण

आणखी दोघांच्या फाशीला स्थगिती निर्भया बलात्कार प्रकरण

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन दोषींच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. १६ डिसेंबर २०१२ ला घडलेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी सहा जणांना दोषी धरण्यात आले होते. एकाने आत्महत्या केली, तर आणखी एक जण अल्पवयीन आहे.
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. या वेळी विनय शर्मा (२१) आणि अक्षय ठाकूर (२९) या दोन दोषींच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली.
या दोघांना या प्रकरणातील आणखी दोन दोषी मुकेश (२७) आणि पवन गुप्ता (२०) यांच्यासोबत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने मुकेश आणि पवन यांच्या फाशीला याआधी स्थगिती दिली आहे.

Web Title: Nirbhaya rape case adjourned for two more hanging