शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case: सॅल्यूट! संयमाची 'सीमा' ढळू न देता न्यायालयात लढली; देशाची वाहवा मिळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 10:47 IST

Nirbhaya Case : या आरोपींचे सारे डावपेच मोठ्या कौशल्याने उधळून लावत फाशीच्या अंतिम क्षणापर्यंत साथ दिली.

ठळक मुद्देसीमा कुशवाह या गेल्या सात वर्षांपासून निर्भयाची बाजू न्यायालयात मांडत होत्या. आरोपींच्या वकिलांनी एक-एक न्यायालयीन पळवाटा शोधत फाशी तब्बल ७ वर्षे लांबविली.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या सहा पैकी चार दोषींना आज अखेर फासावर लटकविण्यात आले. न्यायव्यवस्थेसोबत गेल्या तीन, चार महिन्यांपासून सुरू असलेल्या खेळखंडोब्याला आज पूर्णविराम मिळाला. शेवटच्या रात्रीही या क्रूर नराधमांनी याचिकांवर याचिका करत फाशी टाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलीसाठी न्याय मागणाऱ्या आशा देवी यांच्या संयमाचा बांध फुटला होता. मात्र, त्यांच्यामागे देशवासियांबरोबरच एक वकील ठामपणे उभी राहिली होती. तिनेच या आरोपींचे सारे डावपेच मोठ्या कौशल्याने उधळून लावत फाशीच्या अंतिम क्षणापर्यंत साथ दिली. आज तिचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे. 

आज शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता दोषींना फासावर लटकविण्यात आले आणि देशवासियांनी तिहार तुरुंगाबाहेर आणि उत्तर प्रदेशमध्ये पेढे वाटून ढोल वाजवायला सुरुवात केली. निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला होता. या साऱ्या माहोलामध्ये #SeemaKushwaha हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. कोण आहेत या सीमा कुशवाहा? याच महिलेने उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालयामध्ये ढाल बनून नराधमांच्या वकीलाला कडवी टक्कर दिली होती. सात वर्षे एखाद्या  अती महत्वाच्या प्रकरणात रोज यश दिसत असताना अखेरच्या क्षणी अपयशाला सामोरे जावे लागत होते. तरीही कुशवाह यांनी त्यांच्या हार न मानता संयमाची सीमा ढळू दिली नाही. 

सीमा कुशवाह या गेल्या सात वर्षांपासून निर्भयाची बाजू न्यायालयात मांडत होत्या. सामुहिक बलात्कारानंतर निर्भया आठवडाभर जगण्यासाठी झगडत होती. मात्र, तिची प्राणज्योत मालवली. यानंतर सीमा यांनी निर्भयाचा खटला कोणतीही फी न घेता लढण्याचा निर्णय घेतला. खालच्या कोर्टापासून ते वरच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढा दिला. सुरुवातीला हा लढा सोप असेल असे वाटले होते. कारण तत्कालीन सरकारने त्यासाठी कडक कायदा केला होता. मात्र, नंतर आरोपींच्या वकिलांनी एक-एक न्यायालयीन पळवाटा शोधत फाशी तब्बल ७ वर्षे लांबविली. तरीही सीमा या न डगमगता, न थकता केवळ दोषींना फासावर लटकविणार, या एकाच उद्देशाने लढत राहिल्या आणि अखेर जिंकल्या.या सीमा कुशवाहा यांच्या अभिनंदनाचे काही ट्विट

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयadvocateवकिलSocial Mediaसोशल मीडिया