शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

निर्भया प्रकरणात ज्यांचे कायदेशीर पर्याय संपलेत, त्यांना फासावर लटकवा, केंद्राची न्यायालयाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 4:59 PM

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात विशेष सुनावणीला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्लीः निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात विशेष सुनावणीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करत आहे. न्यायाधीश सुरेश कैत यांच्यासमक्ष ही सुनावणी होत असून, सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली आहे. सॉलिसिटर जनरल युक्तिवाद करताना म्हणाले, दोषी कायद्याचा दुरुपयोग करत आहेत. दोषी पवन जाणूनबुजून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करत नाहीत. ते सर्व विचारपूर्वक असं करत आहेत. दोषी पवन गुप्ता एकाच वेळी दोन अधिकारांचा वापर करत आहेत.2017मध्ये दोषी पवननं 225 दिवसांनंतर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. क्युरेटिव्ह पिटिशन आणि दया याचिका अजूनपर्यंत दोषींकडून दाखल करण्यात आलेली नाही. दोषीनं जर 90 दिवसांच्या आत याचिका दाखल केली नाही, तर त्यांना फासावर चढवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असंही तुषार मेहतांनी स्पष्ट केलं आहे.तुषार मेहतांनी या घटनाक्रमाचा लेखाजोखा न्यायालयासमोर मांडला आहे. दोषींकडून उशिरा याचिका दाखल करून न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवली जात आहे. दोषी मुकेशची दया याचिका रद्द केल्यानंतर त्यानं राष्ट्रपतींच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अक्षयची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. दोषींना हे प्रकरण आणखी लांबवायचं आहे.पवनकडून अद्यापही क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आलेली नाही. मुकेश एक दोषी आहे. दोषी अक्षयला मे 2017मध्ये सर्वोच्च न्यायालयानं फाशीच्या शिक्षेला मंजुरी दिली होती. त्यांनी न्यायालयात दाद मागण्यास उशीर केलेला आहे. विनयच्या प्रकरणातही असंच झालं आहे. 225 दिवसांनंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर 225 दिवसांनंतर करण्यात आलेली दया याचिका फेटाळण्यात आली होती. जोपर्यंत ते क्युरेटिव्ह आणि दया याचिका दाखल करत नाही, तोपर्यंत त्यांना फासावर चढवलं जाणार नाही हे त्यांना माहीत आहे. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप