निर्भया; आरोपीवर तिहारमध्ये हल्ला

By Admin | Updated: August 21, 2015 00:13 IST2015-08-20T23:16:25+5:302015-08-21T00:13:48+5:30

निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विनय शर्मा याने १५ आणि १६ आॅगस्ट रोजी तिहार कारागृहातील पाच

Nirbhaya; The attack on the accused in Tihar | निर्भया; आरोपीवर तिहारमध्ये हल्ला

निर्भया; आरोपीवर तिहारमध्ये हल्ला

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विनय शर्मा याने १५ आणि १६ आॅगस्ट रोजी तिहार कारागृहातील पाच ते सहा सहकैद्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. डाव्या हाताचे, पायाचे हाड मोडल्याचे त्याने न्यायालयाला सादर केलेल्या अर्जात नमूद केले.
विनय शर्मा याच्यावर चोरीच्या वेगळ्या प्रकरणातही खटला सुरू आहे. त्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंग यांच्याकडे अर्ज सादर करताना मारहाणीची माहिती दिली. पाच ते सहा कैद्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर विनय शर्मा याला जीवे मारण्याची धमकीही दिली, असे त्याचे वकील ए.पी. सिंग यांनी म्हटले. निर्भया प्रकरणी अक्षयकुमार, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश या चार आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असून दिल्ली उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Nirbhaya; The attack on the accused in Tihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.