शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

PNB Scam: गुन्हा दाखल होण्याच्या आधी नीरव मोदी होता PM मोदींसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:53 IST

नीरव मोदींच्या या भाजपा कनेक्शनमुळे सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तब्बल 11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यामुळे चर्चेत आलेला उद्योगपती नीरव मोदी याच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी हळूहळू समोर येत आहेत.  काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी आणि इतर काही जणांविरोधात ४.४ कोटी डॉलरच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. ही तक्रार दाखल होण्याच्या आठवडाभरापूर्वीच नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात दावोस येथील आर्थिक परिषदेला हजेरी लावली होती. भारतात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी यावेळी पंतप्रधानांसोबत नेहमीप्रमाणे राजकारणी आणि उद्योगपतींचे शिष्टमंडळही दावोसला गेले होते. या शिष्टमंडळात नीरव मोदी याचाही समावेश होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी 23 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी या शिष्टमंडळासोबत काढलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यापूर्वी 2016 मध्येही नीरव मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत दावोसच्या आर्थिक परिषदेला हजेरी लावली होती. नीरव मोदींच्या या भाजपा कनेक्शनमुळे सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंजाब नॅशलन बँकेकडून 31 जानेवारीला नीरव मोदींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यापूर्वीच्या आठवड्यात नीरव मोदी दावोस परिषदेत होते. नीरव मोदींना हा घोटाळा उघडकीला येण्याची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी गेल्या आठवड्यातच देश सोडल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने याविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सीताराम येचुरी यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNarendra Modiनरेंद्र मोदी