(निनाद) भिवडी येथील सिमेंट रस्त्याचेे उद्घाटन

By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30

नारायणपूर : भिवडी (ता. पुरंदर) येथील गावात जाणारा रस्ता खा. सुप्रिया सुळे यांच्या फंडातून सिमेंटचा करण्यात आला. या रस्त्याचे उद्घाटन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.

(Ninead) inaugurated cement road in Bhiwadi | (निनाद) भिवडी येथील सिमेंट रस्त्याचेे उद्घाटन

(निनाद) भिवडी येथील सिमेंट रस्त्याचेे उद्घाटन

रायणपूर : भिवडी (ता. पुरंदर) येथील गावात जाणारा रस्ता खा. सुप्रिया सुळे यांच्या फंडातून सिमेंटचा करण्यात आला. या रस्त्याचे उद्घाटन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन गरूड, राष्ट्रवादीचे सरचिटणीस साधू दिघे, नवनाथ दिघे, विजय भिंताडे, पंकज भिंताडे, संदीप मोकाशी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदाम भिंताडे, युवक अध्यक्ष संभाजी दिघे, बाबू न्हालवे, सोमनाथ दिघे, अप्पा दिघे आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या माध्यमातून लोकांनी काम करण्याची संधा दिली. त्यांच्या काळात तालुक्यात जेवढा विकास झाला, एवढा विकास पुन्हा तालुक्यात कधीच झाला नाही. विकासाची दिशा असणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जाते, असे जालिंदर कामठे यांनी सांगितले.
नारायणपूर रस्ता ते मारुती मंदिर असा खा. सुप्रिया सुळे यांच्या फंडातून ५ लाखांचा निधी टाकून ६०० फूट रस्ता सिमेंटचा पूर्ण करण्यात आला. अशा पद्धतीने सुप्रिया सुळे यांच्या फंडातून तालुक्यात १ कोटी रुपयांची कामे मार्गी लागली असल्याची माहिती, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण यांनी दिली.
( वार्ताहर )
नावाने फोटो पाठवित आहे.
फोटो ओळी:- भिवडी (ता. पुरंदर) येथील सिमेंटच्या रस्त्याचे उद्घाटन करीत असताना जालिंदर कामठे


छाायचित्र - सुरेश कामठे

Web Title: (Ninead) inaugurated cement road in Bhiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.