नऊ बंडखोर आमदार अपात्र घोषित

By Admin | Updated: December 22, 2015 02:48 IST2015-12-22T02:48:28+5:302015-12-22T02:48:28+5:30

आसाम राज्य विधानसभेचे अध्यक्ष प्रणवकुमार गोगोई यांनी सोमवारी काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले. हे नऊ आमदार काँग्रेसशी बंडखोरी केल्यानंतर भाजपत सामील झाले होते.

Nine rebel MLA declared ineligible | नऊ बंडखोर आमदार अपात्र घोषित

नऊ बंडखोर आमदार अपात्र घोषित

गुवाहाटी : आसाम राज्य विधानसभेचे अध्यक्ष प्रणवकुमार गोगोई यांनी सोमवारी काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले. हे नऊ आमदार काँग्रेसशी बंडखोरी केल्यानंतर भाजपत सामील झाले होते.
‘अध्यक्षांनी सोमवारी सायंकाळी एक आदेश जारी केला आहे. नियमानुसार अध्यक्षांनी एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या; परंतु नंतर दुसऱ्या पक्षात सामील झालेल्या नऊ काँग्रेस आमदारांना तात्काळ प्रभावाने अपात्र ठरविले आहे,’ असे आसाम विधानसभेचे प्रमुख सचिव प्रणवकुमार दास यांनी सांगितले.

Web Title: Nine rebel MLA declared ineligible