पुरवठा अधिकार्याच्या दालनाला कुलूप ठोकले नऊ आंदोलक ताब्यात
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:40+5:302015-06-02T00:03:40+5:30
नाशिक : महसूल अधिकारी, कर्मचार्यांनी पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था ठप्प झाल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या दालनाला कुलूप ठोकून घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या आंदोलनाने धावपळ उडून पोलिसांनी नऊ आंदोलकांना ताब्यात घेतले.

पुरवठा अधिकार्याच्या दालनाला कुलूप ठोकले नऊ आंदोलक ताब्यात
न शिक : महसूल अधिकारी, कर्मचार्यांनी पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था ठप्प झाल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या दालनाला कुलूप ठोकून घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या आंदोलनाने धावपळ उडून पोलिसांनी नऊ आंदोलकांना ताब्यात घेतले. दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या दालनासमोर हा प्रकार घडला. मुस्लीम ब्रिगेडच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी थेट पुरवठा अधिकार्यांच्या दालनासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी दालनात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी नसल्याचे पाहून आंदोलकांनी दालनाला बाहेर कुलूप ठोकले व पुष्पहार घातला. दरम्यान, आंदोलकांच्या आरडा-ओरडामुळे तत्काळ सरकारवाडा पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळातच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. महसूल अधिकारी व कर्मचार्यांच्या काम बंद आंदोलनामुळे रेशन व्यवस्था ठप्प झाली असून, त्यामुळे गोरगरिबांना धान्य मिळणे बंद होऊन उपासमारीची वेळ आली आहे. काम बंद करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करावी व रेशन व्यवस्था सुरू करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांवर मुंबई पोलीस ॲक्ट अन्वये कारवाई करून त्यांची नंतर सुटका केली.