काश्मिरातील स्फोटात पाच जवानांसह नऊ जखमी
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
जम्मू-काश्मिरात सोमवारी स्फोटाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जवानांसह नऊ जखमी झाले.

काश्मिरातील स्फोटात पाच जवानांसह नऊ जखमी
श्रीनगर : जम्मू-काश्मिरात सोमवारी स्फोटाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जवानांसह नऊ जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात बसस्थानकाजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनात झालेल्या स्फोटात दोन जवान व तीन पोलीस जखमी झाले.
वाहनातील अश्रुधुराचे नळकांडे फुटल्याने स्फोट
झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दुसऱ्या घटनेत गांदेरबल जिल्ह्यात सोनामार्गमध्ये निर्माणाधिन पुलाजवळच्या स्फोटात चार कामगार जखमी झाले. (वृत्तसंस्था)
>हंदवाडामध्ये शोध मोहीम
सुरक्षा दलांनी कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडा क्षेत्रातील जंगलांमध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची सूचना मिळाल्यावर संपूर्ण परिसरात सोमवारी शोध मोहीम सुरु केली. दहशतवाद्यांचा शोध लागला नाही.