(निनाद) विद्या वाघ यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30

मंचर : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा लौकी (ता. आंबेगाव) येथील पदवीधर शिक्षिका विद्या पांडुरंग वाघ यांचा जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी जि. प.चे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे होते.

(NINAD) Vidya Wagh has been given the District Teacher Award | (निनाद) विद्या वाघ यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान

(निनाद) विद्या वाघ यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान

चर : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा लौकी (ता. आंबेगाव) येथील पदवीधर शिक्षिका विद्या पांडुरंग वाघ यांचा जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी जि. प.चे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे होते.
विद्या वाघ यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी विविध पूरक उपक्रम राबविले असून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडविले आहेत. इन्स्पायर्ड ॲवॉर्ड स्पर्धेत राज्यस्तरीय सहभाग घेतला असून लेझीम साधन कवायत, स्वच्छ सुंदर शालेय परिसर, मुलींचे शिक्षण आदींसह विविध गुणवत्तापूरक उपक्रमही राबविलेले आहेत. लोकसहभागातून संस्था विकास तसेच गरीब, हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणोपयोगी मदत मिळवून दिली आहे.
या वेळी जि. प. सदस्य प्रमोद कानडे, मथाजी पोखरकर,
गटशिक्षणाधिकारी रामदास पालेकर, विस्तार अधिकारी संचिता अभंग, केेेंद्रप्रमुख विजय सुरकुले, तालुका संघाच्या माजी अध्यक्षा मनीषा बाळासाहेब कानडे, तसेच लौकी गावचे मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटा ओळ : जि. प. आदर्श प्राथमिक शाळा लौकी (ता. आंबेगाव) येथील पदवीधर शिक्षिका विद्या पांडुरंग वाघ यांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करताना जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे.
०००००

Web Title: (NINAD) Vidya Wagh has been given the District Teacher Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.