(निनाद) सासवडला लोकन्यायालयात १२ लाख रुपयांची वसुली
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:19+5:302015-02-14T23:52:19+5:30
सासवड : सासवड न्यायालयात सासवड बार असोसिएशन तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध खटले सामोपचाराने मिटवून जवळपास १२ लाख ९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

(निनाद) सासवडला लोकन्यायालयात १२ लाख रुपयांची वसुली
स सवड : सासवड न्यायालयात सासवड बार असोसिएशन तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध खटले सामोपचाराने मिटवून जवळपास १२ लाख ९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. लोकन्यायालयात बँकांचे खटले प्रामुख्याने मांडण्यात आले. जवळपास ३९० प्रकरणांपैकी २५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, कॉपोर्रेशन बँकेची सुमारे १२ लाख ५६ हजार ९०० रुपयांची वसुली झाली. सासवड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकृष्ण इनामदार यांनी लोकन्यायालयाचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश अरविंद पंडागळे उपस्थित होते. सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष नाझिरकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्य न्यायाधीश इनामदार यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व पटवून सांगितले. लोकन्यायालयात पॅनेलप्रमुख म्हणून सुभाष नाझिरकर, ॲड. प्रकाश खाडे, ॲड. एल. एन. गायकवाड, भरत बोरकर, पंकज बोरावके यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास ॲड. सलीम बागवान, ॲड. दिलीप निकम, प्रशांत लोंढे, विश्वास पानसे, शशांक जगताप उपस्थित होते. बार असोसिएशनचे सचिव ॲड. भरत बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष ॲड. तुषार मिरजकर यांनी आभार मानले.