(निनाद) आबा हे संवेदनशील राजकारणी : चव्हाण

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:28+5:302015-02-18T00:13:28+5:30

नीरा शहरात श्रद्धांजली : विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित

(Ninaad) Aba is sensitive politician: Chavan | (निनाद) आबा हे संवेदनशील राजकारणी : चव्हाण

(निनाद) आबा हे संवेदनशील राजकारणी : चव्हाण

रा शहरात श्रद्धांजली : विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित
नीरा : 'राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने राज्यातील राजकीय क्षेत्राबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. ग्रामीण भागातील समाजहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे आबा हे अत्यंत संवेदनशील होते. राष्ट्रवादीच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्रात आबांचे योगदान मोलाचे ठरले,' अशा शब्दांत पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्ताजीराव चव्हाण यांनी माजी उपमुख्यमंत्री आमदार आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सन २००२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यभर राबविण्यात येत होते. या अभियानांतर्गत तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील नीरा शहराला भेट दिली होती. त्या वेळी दत्ताजीराव चव्हाण यांच्यासह तत्कालीन सरपंच चंद्रकांत धायगुडे, उपसरपंच कल्याण जेधे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण आदी ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आर. आर. पाटील यांचे उत्साहात स्वागत केले. त्या क्षणांची आठवण करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आबांना श्रद्धांजली वाहिली.
फोटो ओळी :-
पुरंदर तालुक्यातील नीरा शहराला तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांनी भेट दिल्यानंतर त्यांचे स्वागत करताना दत्ताजीराव चव्हाण, तत्कालीन सरपंच चंद्रकांत धायगुडे, उपसरपंच कल्याण जेधे,, आदी कार्यकर्ते दिसत आहेत.
( संग्रहित फोटो )

Web Title: (Ninaad) Aba is sensitive politician: Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.