(निनाद) आळे येथे रेडा समाधी सोहळा उत्साहात

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:33+5:302015-02-18T00:13:33+5:30

(Ninaad) Aale at Reda Samadhi Ceremony | (निनाद) आळे येथे रेडा समाधी सोहळा उत्साहात

(निनाद) आळे येथे रेडा समाधी सोहळा उत्साहात

>विविध कार्यक्रम : मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी
आळेफाटा : ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात, संतांच्या अभंगवाणीत टाळ-मृदंगाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीक्षेत्र आळे येथील वेदप्रणीत रेडा समाधीचा सोहळा महाशिवरात्रीच्या दिवशी पृष्पवृष्टी करीत उत्साहात झाला.
श्रीक्षेत्र आळे येथील वेदप्रणीत रेडा समाधीचा ७२०वा समाधी सोहळा, तसेच महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वेदप्रणीत रेडा समाधीच्या सोहळ्यानिमित्ताने सकाळी वसंतवाडीपासून मंदिरापयंर्त मिरवणूक काढण्यात आली. यानंतर दुपारी संजय नाना धोंगडे (देवळानाशिक) यांचे कीर्तन झाले.
दरम्यान, वेदप्रणीत रेडा समाधीवर, तसेच मंदिरावर संजय नाना धोंगडे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी सप्ताह कमिटी अध्यक्ष संजय कुर्‍हाडे, देवस्थान संस्थान अध्यक्ष संदीप डावखर, उपाध्यक्ष भाऊ कुर्‍हाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, प्रसन्न डोके, सरपंच दीपक कुर्‍हाडे, उपसरपंच उदय पाटील, धनंजय काळे, कुन्हू पाटील कुर्‍हाडे, बाळासाहेब गुंजाळ उपस्थित होते. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
फोटो ओळ : वेदप्रणीत रेडा समाधीच्या ७२० व्या सोहळ्या निमित्ताने मंदिरावर पुष्पवृष्टी करताना मान्यवर.

Web Title: (Ninaad) Aale at Reda Samadhi Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.