निमोणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी संघर्ष शिगेला
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30
निमोणे : निमोणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी पंचक्रोशीत उत्सुकता आहे.

निमोणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी संघर्ष शिगेला
न मोणे : निमोणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी पंचक्रोशीत उत्सुकता आहे.कोणत्याही पक्षाचे अथवा गटाचे एकच एक पॅनल नव्हते. प्रत्येक वॉर्डानसार उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार पॅनल तयार केले होते. असे असले तरी विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्या समर्थकांनी या निवडणुका लढविल्या. नवीन रचनेनुसार सभासद संख्या तेरा झाली. त्यापैकी एका भटक्या विमुक्त प्रवर्गातील पात्र महिला उमेदवार न मिळाल्याने ती जागा रिक्त आहे. उरलेल्या बारा जागांपैकी पाच जागी बिनविरोध तर सात जागांसाठी अटीतटीची लढाई झाली. सध्या बारा सभासद आहेत. सरपंचपद हे सर्वसाधारण स्त्री वर्गासाठी राखीव असल्याने यातील सहाही महिला या पदासाठी पात्र आहेत. यात आजी-माजी लोकप्रतिनधींचे स्थानिक समर्थक आघाडीवर असून, सरपंच आपल्याच गटाचा व्हावा यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. सध्या सर्व सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले असून, त्यांचे खंदे कार्यकर्ते मात्र बहुमताच्या जमवाजमवीसाठी साम-दाम याचा वापर करत आहेत. यातून मोठा घोडाबाजार होण्याची शक्यता आहे.