निमगाव सावा ते डिंभे स्वच्छता रॅली
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
निमगाव सावा : निमगाव सावा (ता. जुुन्नर) येथील श्रीपांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यशिक्षणांतर्गत आयोजित निमगाव सावा ते डिंभे जलाशय या दोन दिवसीय स्वच्छता रॅलीस सिंधूताई सपकाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
निमगाव सावा ते डिंभे स्वच्छता रॅली
निमगाव सावा : निमगाव सावा (ता. जुुन्नर) येथील श्रीपांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यशिक्षणांतर्गत आयोजित निमगाव सावा ते डिंभे जलाशय या दोन दिवसीय स्वच्छता रॅलीस सिंधूताई सपकाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.निमगाव सावा ते डिंभे धरण जलाशयादरम्यान आयोजित केलेली ही स्वच्छता रॅली रांजणी, मंचर, शिनोलीमार्गे जाणार आहे. या सायकल रॅलीत स्वच्छतेसह बेटी बचाओ, पर्यावरण संवर्धन याबाबतही जनजागृती करणार आहे. या रॅलीच्या प्रस्थानावेळी सिंधूताई सपकाळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, उद्योगपती भास्कर गाडगे, सरपंच इब्राहिम पटेल, उपसरपंच जिजाभाऊ थोरात, उपप्राचार्य छाया बारवे आदींसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो ओळी : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाच्या निमगाव सावा ते डिंभे जलाशय या स्वच्छता रॅलीस सुरुवात करताना सिंधूताई सपकाळ, उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.