निमातर्फे २४ पासून औद्योगिक प्रदर्शन

By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:04+5:302015-02-14T01:07:04+5:30

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्यावतीने दर तीन वर्षांनी भरविण्यात येणारे औद्योगिक प्रदर्शन निमा इण्डेक्स २०१५ यावर्षी २४ ते २७ एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे. प्रदर्शनातील स्टॉल्स बुकींगचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

NIMA has demonstrated 24 industrial exhibits | निमातर्फे २४ पासून औद्योगिक प्रदर्शन

निमातर्फे २४ पासून औद्योगिक प्रदर्शन

तपूर : नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्यावतीने दर तीन वर्षांनी भरविण्यात येणारे औद्योगिक प्रदर्शन निमा इण्डेक्स २०१५ यावर्षी २४ ते २७ एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे. प्रदर्शनातील स्टॉल्स बुकींगचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
निमाच्यावतीने दर तीनवर्षांनी औद्योगिक प्रदर्शन भरविण्यात येते. नाशिकमधील उद्योगांची वाढ लक्षात घेता उद्योजकांना आपले दर्जेदार उत्पादन राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांसमोर मांडता यावे आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राबरोबरच जिल्‘ाचा पर्यायाने राज्याचा विकास व्हावा या हेतुने निमाच्या १२ व्या निमा इण्डेक्स २०१५ स्टॉल्स बुकींगचा शुभारंभ महिद्रा ॲण्ड महिद्राचे उपाध्यक्ष हिरामण अहेर, कॉम्प्टन ग्रिव्हजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मुकुल श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदरचे प्रदर्शन बॉश कंपनीचे उपाध्यक्ष एच.बी. थॉन्टेश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. उपाध्यक्ष म्हणुन संजीव नारंग काम पहाणार आहेत.
औद्योगिक प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकच्या उद्योग विश्वाच्या क्षमतेचे भव्य प्रदर्शन घडविण्याचा मानस निमाचे अध्यक्ष रवी शर्मा यांच्या केला. प्रदर्शन मैदान पीटीसी समोर भरविण्यात येणार असून या प्रदर्शनात इंजिनिअरींग उद्योग, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स आय.टी. हार्डवेअर, प्लॅस्टीक, रबर, रियल इस्टेट, टुरिझम इंडस्ट्रीज, बँकींग फायनान्स वायनरी उद्योग, अपारंपारीक उर्जा, आदि विभागांसाठी वेगवेगळी १५० स्टॉल्स उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे प्रदर्शन समितीचे अध्यक्ष एच.बी. थॉटेश यांनी दिली. यावेळी के.एल. राठी, प्रदीप बुब, सतीश कोठारी, संदीप सोनार, हर्षद ब्राम्हणकर, मिलिंद राजपूत, मोहन पाटील, किरण पाटील, अखिल राठी, शशिकांत जाधव, अनिल बावीस्कर, किरण जैन, मनोज पिंगळे, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळ, आशिष नहार, आदिसह उद्योजक उपस्थित होते. निमाचे मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी आभार मानले.

Web Title: NIMA has demonstrated 24 industrial exhibits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.