निलोफरचे संकट; गुजरात सज्ज
By Admin | Updated: October 30, 2014 00:40 IST2014-10-30T00:40:46+5:302014-10-30T00:40:46+5:30
निलोफर चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी गुजरात व राजस्थानातील प्रशासनासह सीमा सुरक्षा दले व अन्य यंत्रणा पुरेशा साधनसामग्रीनिशी व मनुष्यबळासह सज्ज झाल्या आहेत.

निलोफरचे संकट; गुजरात सज्ज
नवी दिल्ली : निलोफर चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी गुजरात व राजस्थानातील प्रशासनासह सीमा सुरक्षा दले व अन्य यंत्रणा पुरेशा साधनसामग्रीनिशी व मनुष्यबळासह सज्ज झाल्या आहेत.
गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 14 पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये 55क् हून अधिक सदस्य असून त्यांच्याजवळ नावा, मदतकार्यासाठी लागणारी सर्व सामग्री उपलब्ध आहे. गुजरातच्या सोमनाथ, गांधीधाम, द्वारका, पोरबंदर, जुनागड व वीरावलमध्ये ही पथके तैनात आहेत.
तसेच राजकोट व वडोदरात एक-एक, सूरत, कच्छ व भूजमध्ये दोन-दोन पथके नेमण्यात आली आहेत. याखेरीज राजस्थानच्या जोधपूरमध्येही दोन पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफचे उप महानिरीक्षक रणदीप राणा यांना राज्य सरकारसोबत समन्वय साधण्याकरिता गांधीनगरला पाठविले जात आहे.
पाकिस्तान सीमेलगत असलेल्या राजस्थानच्या जिलंमध्ये निलोफरपासून व घुसखोरीपासून संरक्षण देण्यासाठी सीमा सुरक्षा दल व पोलिसांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबरला या प्रदेशात निलोफरचा प्रभाव जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्हाधिकारी एन.एल. मीणा यांनी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.