निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला दिले गुंगीचे औषध

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:05+5:302015-02-20T01:10:05+5:30

निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला दिले गुंगीचे औषध

Nigamuddin Express provided the passenger to the patient | निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला दिले गुंगीचे औषध

निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला दिले गुंगीचे औषध

जामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला दिले गुंगीचे औषध
२६ हजार पळविले : कामासाठी गेला होता सिकंदराबादला
नागपूर : निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन एका प्रवाशाजवळील २६ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली. गुरुवारी या प्रवाशाला शुद्ध आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार लोहमार्ग पोलिसांना सांगितला.
रामअचल भोलानाथ गौड (३६) रा. गोरखपूर हा काम करण्यासाठी ४ महिन्यापूर्वी सिकंदराबादला गेला होता. १७ फेब्रुवारीला तो १२७२१ निजामुद्दीन एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. जनरल कोचमध्ये दोन पुरुष खाली आणि त्यांच्या सोबतची एक महिला वरच्या बर्थवर बसली होती. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर या पुरुषांनी रामअचलला वरच्या बर्थवर बसण्यास सांगितले. तो वरच्या बर्थवर गेला असता महिलेने त्याला आणि तिच्यासोबत असलेल्या दोघांना चॉकलेट दिले. चॉकलेट खाल्ल्यानंतर ते कडू लागल्याने रामअचलने चॉकलेट फेकून दिले. परंतु त्यानंतर पाच मिनिटातच त्याची शुद्ध हरवली. त्यानंतर आरोपी जुने कपडे, बॅगमधील रोख २० हजार, पँटच्या खिशातील ६ हजार आणि ३०० रुपये चिल्हर असा एकूण २६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन लंपास झाले. नागपुरात या प्रवाशाला गाडीखाली उतरविल्यानंतर त्यास मंगळवारी मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यास गुरुवारी शुद्ध आली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्याचे बयाण नोंदवून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
...................

Web Title: Nigamuddin Express provided the passenger to the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.