शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खलिस्तानवादी पन्नूवर NIA ची मोठी कारवाई; अमृतसर, चंडीगढमधील संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 13:56 IST

पन्नू सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून तो तेथून सतत्यानं व्हिडीओ जारी करत भारताविरोधात गरळ ओकत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) खलिस्तानवादी आणि बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिसचा (SFJ) नेता गुरपतवंत सिंग पन्नू याची मालमत्ता जप्त केली आहे. पंजाबमधील अमृतसर आणि चंडीगढमधील मालमत्तेवर एनआयएनं कारवाई केली. पन्नू सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून तो तेथून सतत्यानं व्हिडीओ जारी करत भारताविरोधात गरळ ओकत आहे.एनआयएनं पन्नूच्या ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यामध्ये अमृतसर जिल्ह्याच्या बाहेरील खानकोट या वडिलोपार्जित गावातील शेती आणि सेक्टर १५, सी चंदीगडमधील त्याच घर यांचा समावेश आहे. आता या मालमत्तेवरील पन्नूचा हक्क संपला असून ही सरकारी मालमत्ता असेल असा या जप्तीचा अर्थ आहे.२०२० मध्येही त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. याचा अर्थ असा होता की तो मालमत्ता विकू शकणार नव्हता. परंतु या पावलानंतर पन्नूनं मालमत्तेचे मालकी हक्क गमावले आहेत.पन्नूनं दिली धमकीखलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या कॅनडात झालेल्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नूने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकावत देश सोडण्यास सांगितलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत कॅनडातील हिंदूंनी ट्रूडो सरकारला एक पत्रही लहिलंय. यामध्ये पन्नूचं भाषण हे हेट क्राईम म्हणून नोंदवण्यात यावं अशी विनंती केलीये.

कोण आहे पन्नू?गुरपतवंत सिंग पन्नू हा मूळचा पंजाबमधील खानकोट येथील असून तो सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन पन्नू परदेशात गेला. तेव्हापासून तो कॅनडा आणि अमेरिकेत राहत आहे. परदेशात राहून तो खलिस्तानी कारवाया करत असून वेळोवेळी व्हिडीओ जारी करून भारत सरकारविरुद्ध अनेकदा त्यानं गरळ ओकली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीनं, त्याने शिख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (SFJ) नावाची संघटना देखील स्थापन केली आहे. या संघटनेवर २०१९ मध्ये भारताने बंदी घातली होती.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाIndiaभारतGovernmentसरकार