शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएची चार राज्यांत छापेमारी; जिहादी दहशतवादी संघटनेच्या प्रकरणात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 12:30 IST

एनआयएने एकट्या कर्नाटकातील १९ ठिकाणी छापे टाकले आहेत.

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. एनआयएचे पथक कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. जिहादी दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कशी संबंधित प्रकरणात एनआयएचे पथक एकाच वेळी छापे टाकत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने एकट्या कर्नाटकातील १९ ठिकाणी छापे टाकले आहेत. यापूर्वी १३ डिसेंबर रोजी एनआयएने दहशतवादी कट प्रकरणी बंगळुरूमध्ये ६हून अधिक ठिकाणी शोध घेतला होता. दहशतवाद्यांशी संबंध असल्‍याचा संशय असल्‍याच्‍या संशयितांच्‍या ठिकाणी शोधमोहीम सुरूच आहे.

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या १५ दहशतवाद्यांना ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागातून अटक केल्यानंतर शोध सुरू करण्यात आला होता. त्यानंतर एनआयएच्या पथकाने पुणे, मीरा रोड, महाराष्ट्रातील ठाणे आणि कर्नाटकातील बेंगळुरूसह अन्य ४४ ठिकाणी छापे टाकले.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाKarnatakकर्नाटक