शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 06:35 IST

आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता.

मुंबई : देशातील विविध भागात दहशतवादी हल्ले करण्याच्या कटात सहभागी असलेल्या इसिसच्या ७ सदस्यांविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले. पुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात यूएपीए कायद्यासह विविध कलमांतर्गत मुंबईच्या एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता. त्यांनी दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, त्यांना आश्रय देणे, तसेच आईडीची निर्मिती करण्याचाही आरोप ठेवण्यात आला. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासासाठी ६९ दिवसांची मुदतवाढ देण्याची एनआयएची विनंती न्यायालयाने फेटाळली.

अनेक राज्यांत केली होती रेकीदहशतवादी हल्ले करण्यासाठी आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये रेकी केली होती. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचविण्यासह नेमके कुठे स्फोट घडवता येतील, याची चाचपणी रेकीदरम्यान त्यांनी केली.स्फोट झाल्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे सविस्तर योजना आखलेली होती. त्यानुसार त्यांनी दुर्गम भागातील घनदाट जंगलांतील संभाव्य ठिकाणेही निश्चित केली होती. त्यासाठी ड्रोनचाही वापर केला होता.

मोठे नेटवर्क उद्ध्वस्तअटक केलेल्या आरोपींनी भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याच्या हेतूने इसिसच्या दहशतवादी कारवाया वाढविण्याचा कट आखला होता. त्यांच्या अटकेमुळे इसिसचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपपत्रात कुणाची आहेत नावे? मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश)मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (रा. रतलाम, मध्य प्रदेश)कदीर दस्तगीर पठाण (रा. कोंढवा, पुणे)सीमाब नसीरुद्दीन काझी (रा. कोंढवा, पुणे)जुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, ठाणे)शमील साकीब नाचन (रा. पडघा, ठाणे)आकीफ अतीक नाचन (रा. पडघा, ठाणे)

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीISISइसिस