‘त्या’ दहशतवाद्यांना एनआयए कोठडी
By Admin | Updated: January 25, 2016 01:55 IST2016-01-25T01:55:55+5:302016-01-25T01:55:55+5:30
इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांना १३ दिवसांसाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत पाठविण्यात आले आहे

‘त्या’ दहशतवाद्यांना एनआयए कोठडी
नवी दिल्ली : इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांना १३ दिवसांसाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत पाठविण्यात आले आहे.
हैदराबादचे निवासी अबू अनास आणि नफीस खान या दोन्ही संशयितांना रविवारी पटियाला येथील विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १३ दिवसांची एनआयए कोठडी मंजूर केली. एनआयए आणि अन्य तपास संस्थांनी शुक्रवारी आणि शनिवारी देशभरात छापे घालून १४ जणांना अटक केली होती.
हे सर्वजण प्रजासत्ताकदिनी मोठा हल्ला करण्याच्या विचारात होते, असा आरोप आहे. (वृत्तसंस्था)