NIAने हैदराबादमध्ये केले इसिसचे मॉड्यूल उध्वस्त, ११ जणांना अटक
By Admin | Updated: June 29, 2016 10:56 IST2016-06-29T10:56:28+5:302016-06-29T10:56:52+5:30
एनआयएने बुधवारी हैराबादमध्ये छापा मारून इसिसचे मॉड्यूल उध्वस्त करत ११ जणांना ताब्यात घेतले आहे.

NIAने हैदराबादमध्ये केले इसिसचे मॉड्यूल उध्वस्त, ११ जणांना अटक
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २९ - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी तेलंगणातील हैदराबादमध्ये छापा मारून कुख्यात दहशतवादी संघटना इसिसचे मॉड्यूल उध्वस्त करत ११ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच या ठिकाणाहून अधिका-यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि १५ लाख रुपये जप्त केले.
पोलिस अधिका-यांच्या माहितीनुसार, पकडलेले गेलेले हे सर्वजण काही संशयित कारवाईत गुंतले असून ते सीरियातील त्यांच्या प्रमुखाशी संपर्कार राहून हैदराबाद व भारतात मोठ्या प्रमाणात घातपाताच्या कारवाई करण्याच्या तयारीत होते. एनआयए अधिका-यांनी शहरातील विविध भागांत छापेमारी केली असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या वर्षाच्या सुरूवातीलाच एनआयएने असेच काही छापे मारून इसिसशी जोडल्या गेलेल्या १४ संशियतांना अटक केली होती, त्यापैकी दोघांना हैदराबादमधूनच अटक झाली होती.