वाहनधारकांना बसणार झटका! महामार्गावरील प्रवास महागणार, १ एप्रिलपासून टोलचे दर वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:10 PM2023-03-23T14:10:57+5:302023-03-23T14:16:16+5:30

तुम्हीही महामार्गावरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

nhai may increase toll rate by 3 to 6 percent on delhi mumbai expressway from 1st april | वाहनधारकांना बसणार झटका! महामार्गावरील प्रवास महागणार, १ एप्रिलपासून टोलचे दर वाढणार

वाहनधारकांना बसणार झटका! महामार्गावरील प्रवास महागणार, १ एप्रिलपासून टोलचे दर वाढणार

googlenewsNext

तुम्हीही महामार्गावरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील टोलचे दर वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या १ एप्रिलपासून गुरुग्राममधून जाणारा हायवे आणि एक्स्प्रेस वेववरुन प्रवास करणे महागणार आहे. दिल्ली-जयपूर हायवेचा खेरकी दौला टोल प्लाझा, गुडगाव-सोहना रोडवरील घमदोज टोल प्लाझा ओलांडण्यासाठी ५ ते १० टक्के जास्त टोल टॅक्स भरावा लागणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील टोल दरात ३ ते ६ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून या प्रस्तावांवर विचार केला जाईल. परस्पर वाटाघाटीच्या आधारेच टोलचे नवीन दर मंजूर केले जातील. खेरकिडोला टोल प्लाझावर एकेरी जाण्यासाठी ८० रुपये टोल भरावा लागतो. या टोलवर रिटर्न स्लिप सिस्टीम नाही, त्यामुळे तुम्हाला त्या बदल्यात ८० रुपये देखील द्यावे लागतील.

Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी, २ स्टॉक्सला लागलं अप्पर सर्किट; गुंतवणूकदारांची चांदी

अशाप्रकारे कार चालकाला प्रवासासाठी टोलवर १६० रुपये द्यावे लागतात. आगामी काळात टोल ८० रुपयांवरून ८५ रुपयांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. तुम्हाला १६० ऐवजी १७० रुपये द्यावे लागतील. खेरकिदौला टोलनाक्यावरून दररोज ६० ते ७० हजार वाहनांची ये-जा असते. या बदलानंतर या टोलवरून जाणाऱ्यांचा प्रवास १० रुपयांनी  महाग होईल.

दिल्ली-मुंबई महामार्गाचे उद्घाटन होऊन एक महिन्याहून अधिक वेळ झाला. यावर प्रति किमी २.१९ रुपये टोल टॅक्स आकारला जातो. नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिलपासून टोल दरात वाढ होण्याची शक्यता आहे. टोलचे दर ३ ते ५ टक्क्यांनी वाढू शकतात असा दावा करण्यात येत आहे. या संदर्भात ३० किंवा ३१ मार्चला नोटीफीकेसन निघू शकते. 

सोहना रोडवरील घमदौज प्लाझा येथे चारचाकी वाहनांना एकेरी मार्गासाठी ११५ रुपये आणि परतीसाठी ६० रुपये टोल भरावा लागतो. येण्या-जाण्याचा एकूण खर्च १७५ रुपये होता. या टोलनाक्यावर दोन्ही बाजूंकडून टोल वाढण्याची अपेक्षा आहे.

Web Title: nhai may increase toll rate by 3 to 6 percent on delhi mumbai expressway from 1st april

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.