आतील पानासाठी -पोलिसांना चकवा देत अल्पवयीन मुलीवर दुसर्‍यांदा बलात्कार

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:29+5:302015-07-10T23:13:29+5:30

पोलिसांना चकवा देत अल्पवयीन मुलीवर दुसर्‍यांदा बलात्कार

For the next page - Rape for the second time on minor girls by giving police permission | आतील पानासाठी -पोलिसांना चकवा देत अल्पवयीन मुलीवर दुसर्‍यांदा बलात्कार

आतील पानासाठी -पोलिसांना चकवा देत अल्पवयीन मुलीवर दुसर्‍यांदा बलात्कार

लिसांना चकवा देत अल्पवयीन मुलीवर दुसर्‍यांदा बलात्कार
नराधम जेरबंद : वरिष्ठ पोलीस अधिकारी अनभिज्ञ, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित
जालना : जेरबंद करण्यासाठी सापळा रचलेला असताना पोलिसांसमोरच अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर दुसर्‍यांदा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उशिरा जालन्यात घडली़ याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, दोन्ही तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मित्रासह नाव्हा बायपास रस्त्यावर फिरायला गेलेल्या साडेसतरा वर्षीय मुलीवर दोन तोतया पोलिसांनी सोमवारी रात्री अत्याचार केला होता़ पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री पिडीत मुलीचा मोबाईल घटनास्थळी राहिला होता़ तो परत देण्यासाठी या नराधमांनी पिडीत मुलीच्या आईच्या मोबाईलवर संपर्क साधत दोन हजारांची खंडणी मागितली. आईने याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन गुरुवारी सापळा लावला. मात्र, ते पोलिसांच्या हाती लागले नाही. पुन्हा त्याच रात्री दोघांनी पिडीत मुलीच्या आईशी संपर्क साधून मोबाईल घेण्यासाठी अंबड चौफुलीजवळील रेल्वे उड्डाणपूल परिसरात बोलावले. त्यामुळे पोलिसांनी त्याच रात्री पुन्हा सापळा रचला. त्यानुसार मुलीला मंठा चौफुलीहून स्कुटीवर पाठविण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मुलगी उभी असताना दोन्ही नराधमांनी तिला जवळच्या नाल्यात नेऊन अत्याचार केला. पिडीत मुलगी ओरडत आल्याने हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला, मात्र तोपर्यंत दोन्ही नराधमांनी धूम ठोकली. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, आरोपींनी नियोजित ठिकाणी येण्यापूर्वीच मुलीला गाठून रेल्वे उड्डाणपुलाखाली बलात्कार केला व नंतर तिला रस्त्यावर सोडून दिले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच जालना गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्रीच रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपींना जेरबंद केल्याची माहिती नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ तर सापळा लावलाच नव्हता. रात्री ८.३० च्या सुमारास तिच्या नातेवाईकांनी मला माहिती दिली. त्यावरून आरोपींना पकडण्यासाठी आपण वरिष्ठांना माहिती देवून सापळा लावणार होतो. मात्र, त्यापूर्वीच ती मुलगी घराबाहेर पडली आणि ही घटना घडली, असे स्पष्टीकरण विशेष कृृती दलाचे प्रमुख विनोद इज्जपवार यांनी दिले आहे़ (प्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
अत्याचाराचे चित्रीकरण
आरोपींनी सोमवारी पीडित मुलीवर अत्याचार करताना मोबाईलद्वारे चित्रीकरण केले होते. त्या क्लिपसाठीच आरोपींनी पिडीत मुलीच्या आईकडे खंडणी मागितली होती. अटक केल्यानंतर आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आला असला तरी त्यात ती क्लिप आढळून आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर अटकेपूर्वी ती क्लिप डिलीट करण्यात आली असावी. त्यामुळे ही क्लिप परत मिळविण्यासाठी सायबर तज्ज्ञाची मदत घेण्यात येणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
परस्पर रचला सापळा!
पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बैठकीत आहोत. या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांशी बोला, असे सांगितले. उपविभागीय अधिकारी दीक्षीतकुमार गेडाम म्हणाले की, या सापळ्यात किती पोलीस होते याची माहिती नाही. माझ्या परस्पर हा सापळा रचण्यात आला होता.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
खरे काय?
सापळा अयशस्वी झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना निलंबित करण्यात आले असल्याचे विशेष पोलीस महानिक्षक विश्वास नांगरे -पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मात्र, सापळा लावण्यापूर्वीच ही घटना घडल्याचे इज्जपवार यांनी स्पष्ट केल्याने घटनेचे गूढ वाढले आहे़

Web Title: For the next page - Rape for the second time on minor girls by giving police permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.