‘आप’मध्ये नवचैतन्य; देशभरात जल्लोष
By Admin | Updated: February 11, 2015 02:14 IST2015-02-11T02:14:05+5:302015-02-11T02:14:05+5:30
विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी सकाळी जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचा कल हाती येताच देशभरातील ‘

‘आप’मध्ये नवचैतन्य; देशभरात जल्लोष
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी सकाळी जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचा कल हाती येताच देशभरातील ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवास सामोरे जाव्या लागलेल्या पक्षाच्या समर्थकांमध्ये दिल्लीतील विजयानंतर पुन्हा चैतन्य संचारले. दिल्लीत तर जणू दिवाळीचे वातावरण होते. चेन्नई आणि भोपाळमधील ‘आप’च्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. राजधानीतील पटेलनगरस्थित ‘आप’च्या कार्यालयात मोठ्या टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. निकाल जाहीर होऊ लागताच कार्यकर्त्यांनी तेथे एकच गर्दी केली. अरविंद केजरीवाल सकाळीच कार्यालयात पोहोचले होते. पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, कुमार विश्वास, योगेंद्र यादव आणि आशिष खेतान हेही सकाळीच कार्यालयात पोहोचले.