बातमी पान १

By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:13+5:302015-09-04T22:45:13+5:30

News Page 1 | बातमी पान १

बातमी पान १

>दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत दाखल

पुलाखाली मांडला संसार : विदर्भ मराठवाड्यातील शेकडो कुटुंबियांचे स्थलांतर

प्राची सोनावणे, नवी मुंबई : राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची भयाण स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरणीही झालेली नाही. ना प्यायला पाणी, ना हाताला काम, त्यामुळे शेकडो दुष्काळग्रस्त मुंबई, नवी मुंबईत येवू लागले आहेत. मिळेल ते काम करून उड्डाणपुलाखाली व जागा मिळेल तिथे मुक्काम आपला उदरनिर्वाह करत आहेत. येथेही त्यांच्यावरील उपासमार टचळलेली नाही.
राज्यात २०१२ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळापेक्षा गंभीर स्थिती यावर्षी निर्माण झाली आहे. जगायचे कसे असा प्रश्न पडलेली शकडो कुंटुंब रोजगाराच्या शोधात मुंबई, नवी मुंबईमध्ये येवू लागली आहेत. जालना,नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली व इतर जिल्ह्यातील जवळपास ४०० कुटंुबे नवी मुंबईत आली आहेत. यामधील जवळपास १०० जणांनी तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. अनेकजण नाकाकामगार म्हणून मिळेल ते काम करत आहेत. दिवसभर मिळालेल्या पैशावर धान्य विकत घेवून पुलाखालीच दगडाच्या चुलीवर जेवण बनविले जात आहे. काम करण्याची क्षमता नसलेली कुटुंबातील वयस्कर माणसे रेल्वे स्टेशन व इतर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत आहेत. कर्जबाजारी शेतकर्‍यांपुढे पिकाअभावी झाले असून कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळी संपली की विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त मुंंबईत येतात. पावसाळा सुरू झाला की गावाकडे जातात. यावर्षी पाऊसच पडला नसल्यामुळे गतवर्षी आलेल्यांनीही गावी जाणे टाळले आहे. पाऊसच नाही तर गावी जाऊन काय करणार असे मत अनिल धनगरे या शेतकर्‍याने व्यक्त केले आहे. तुर्भे नाक्यावर नाका कामगार म्हणून काम करत असल्याचेही त्यांनी संगितले. शोभा बागडे या महिलेने सांगितले की अनेक शेतकर्‍यांनी वृद्ध आई -वडील, लहान मुलांना गावी ठेवले असून काम मिळविण्यासाठी येथे आले आहेत. गावाकडील माणसांसाठी जीव तुटत असल्याचे सांगताना त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी झाली.. पावसाने दगा दिल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. वर्षभर कसे जगायचे असा प्रश्न पडला असून आत्तातरी पाऊस पडावा असे साकडे देवाला घातले असल्याची प्रतिक्रिया कल्पना कांबळे यांनी व्यक्त केली आहे.


दुष्काळ चौकट

मुलांची लग्न रखडली
गावी उत्पन्नाचे साधन नाही. दुष्काळामुळे मजुरीची कामेही मिळत नाहीत. दुष्काळामुळे गावाकडे मुलांची लग्न होणेही अवघड झाले आहे. मिळेल ते काम करून चार पैशे मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
लता गायकवाड, यवतमाळ

कर्ज फेडायचे कसे
लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न पडला आहे. दुष्काळामुळे दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडू लागली असल्यामुळे रोजगाराच्या शोधात मंुबईला आलो आहे.
उमाबाई गजभे, शेतकरी यवतमाळ, गाव - कुसद

उपाशीपोटी झोपावे लागते
गावाकडे रोजगाराचे साधन नसल्यामुळे मुंबईत आलो आहे. कामासाठी नाक्यावर उभे रहावे लागते. कधी काम मिळते कधी मिळत नाही. कित्येक वेळा काम न मिळाल्यामुळे उपाशीपोटी झोपावे लागत आहे.
किसन माळी, शेतकरी जालना
फोटो
०४दुष्काळग्रस्त, नावाने चिंचपोकळीत टाकत आहे

Web Title: News Page 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.