शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शवत! महिला IAS अधिकाऱ्याची सरकारी रुग्णालयात प्रसुती, गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 09:52 IST

गोड्डा येथील उपायुक्त किरण कुमारी पासी यांनी सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

रांची - सरकारी रुग्णालय म्हटलं की नको रे बाबा. कारण, सुविधांचा अभाव आणि तेथील कर्मचाऱ्यांचा बडेजावमुळे सर्वसामान्य नागरिक सरकारी रुग्णालयापासून दूरच राहतो. सरकारी प्रशासन व्यवस्थेबद्दलची अनास्थाही यास कारणीभूत आहे. त्यामुळे, पर्याय नसेल तरच सरकारी रुग्णालयात उपचार नागरिकांकडून घेतले जातात. विशेष म्हणजे मध्यमवर्गीय नागरिकही सरकारी रुग्णालयात जाणे टाळतो. मात्र, चक्क एका आयएएस अधिकारी महिलेने चक्क प्रसुतीसाठी सरकारी रुग्णालयाची निवड केली. 

नायक चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री बनल्यानंतर चक्क रिक्षाने कार्यालयात पोहोचतो, त्यावेळी त्याचा पीए असलेला अभिनेता परेश रावल म्हणतो की, यहाँ तो छोटा मोठा भी इनोव्हा मे आता है, और ये सीए ऑटो मे.... अगदी असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. कारण, आदिवासीबहुल झारखंड राज्यातील गोड्डा येथे सेवा बजावत असलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्याने आपली प्रसुती चक्क सरकारी रुग्णालयात केली. जिथं नगरपालिकेतील साधा कर्मचारीही पाय ठेवायला नको म्हणतो, तिथं चक्क महापालिकेच्या उपायुक्तांनीच सरकारी रुग्णालयात जाणे पसंत केले, तेही स्वत:च्या प्रसुतीसाठी. 

गोड्डा येथील उपायुक्त किरण कुमारी पासी यांनी सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. किरण कुमारी यांनी आपली प्रसुती सरकारी रुग्णालयातच करण्याची निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे सिजेरियन ऑपरेशन असतानाही, त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. किरण कुमारी यांनी गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ आणि त्याची आई दोन्हींची प्रकृती उत्तम आहे. रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांनीही जिल्हाधिकारी मॅडमच्या या निर्णयाचे कौतुक केले. तसेच, किरण कुमारी यांनी समाजाला एक सकारात्म दिशा दिली आहे. जिथे साधारण व्यक्तीही सर्दी-खोकल्याच्या आजारासाठी खासगी आणि मोठ्या रुग्णालयात जातात, तिथं जिल्हाधिकारी मॅडमच्या या निर्णयामुळे मोठा सकारात्म बदल होईल, असेही त्यांनी म्हटले. सरकारी अधिकाऱ्यांनी किरण यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली आहे. तसेच, देवधर जिल्ह्याच्या कलेक्टर नैंसी सहाय यांनीही किरण कुमार यांचं कौतुक केलंय. 

टॅग्स :Jharkhandझारखंडhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तdoctorडॉक्टर