चाळीसगावसाठी बातमी श्री.बोरसेसाहेब/लोकमत सखी मंचतर्फे उद्या श्रावण सोहळा
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30
लोगो सखी मंच लोगो

चाळीसगावसाठी बातमी श्री.बोरसेसाहेब/लोकमत सखी मंचतर्फे उद्या श्रावण सोहळा
ल गो सखी मंच लोगोचाळीसगाव : लोकमत सखी मंचतर्फे २८ ऑगस्ट रोजी आर.के.लॉन येथे दुपारी २ वाजता श्रावणसोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सखीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण सुरू झाला की विविध सण-उत्सवाला सुरुवात होते. यानिमित्त सखी मंचतर्फे सर्वांसाठी आज उखाणा, मेहंदी आणि श्रावणसाज या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उखाणा स्पर्धेमध्ये एका सखीला एकच उखाणा घेता येईल. मेहंदीसाठी अर्धातास वेळ दिला जाणार आहे. मेहंदीसाठी मॉडेल सोबत आणावी. श्रावणसाजमध्ये फळे, पान-फुले यापासून निर्मित दागिने घालून या फॅशन शोमध्ये सहभागी होता येईल.प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमासाठी छाजेड इंटेरिअर आणि गीफ्ट पार्टनर एस.के.ऑईलचे सहकार्य लाभले. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सकाळी दहानंतर ९९२२२४०७९४ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त सखींनी कार्यक्रमाला यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.