थोडक्यात बातम्या.....
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:36+5:302015-01-31T00:34:36+5:30
दोन्ही फोटो आहेत.....

थोडक्यात बातम्या.....
द न्ही फोटो आहेत.....हलबा आदिवासी मेळावा उत्साहातनागपूर : अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघातर्फे जुनी मंगळवारी येथील कोलबास्वामी सभागृहात विदर्भस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महापौर प्रवीण दटके, खासदार नाना पटोले, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे प्रमुख अतिथी होते. मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. ॲड. बी. के. हेडाऊ व संशोधक टी. यू. नंदनवार यांचा सत्कार करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष धनंजय धार्मिक, दुर्गेश गडकरी, दुर्वास धार्मिक, पुरुषोत्तम बारापात्रे, दिनेश छप्परघरे, देवेंद्र बोकडे, प्रकाश दुलेवाले, चंदू पराते, मनोहर घोराडकर आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.प्रमोद मेरगुवार यांचा सत्कारनागपूर : बुटीबोरी येथे कार्यरत हेड कॉन्स्टेबल प्रमोद मेरगुवार यांना गुन्ह्याच्या तपासात चांगले कार्य केल्यामुळे पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. तपासात चांगले सहकार्य केल्यामुळे आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ४९८-अ अंतर्गत १ वर्षे कारावसाची शिक्षा झाली. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम व पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग उपस्थित होत्या.