सचिन तेंडुलकरची सोशल मिडीयावर नवी इनिंग

By Admin | Updated: March 2, 2017 16:47 IST2017-03-02T16:47:48+5:302017-03-02T16:47:48+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने सोशल मिडीयावर नवी इनिंग सुरू केली

New Year on Sachin Tendulkar's social media | सचिन तेंडुलकरची सोशल मिडीयावर नवी इनिंग

सचिन तेंडुलकरची सोशल मिडीयावर नवी इनिंग

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने सोशल मिडीयावर नवी इनिंग सुरू केली आहे. गुरूवारी सचिनने प्रोफेशनल सोशल मिडीया प्लॅटफॉर्म लिंक्डइन (linkedin.com)वर अकाउंट ओपन केलं. 
 
सचिनने स्वतः ट्विटकरून याबाबत माहिती दिली. आजच्या काळात सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळेच मी सर्व ठिकाणी अकाउंट ओपन करत आहे असं त्याने ट्विट केलं आहे. 
 
यावेळी लिंक्डइनवर सचिनने एक ब्लॉग लिहीला आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये सकाळी उठताना मला त्रास जाणवला त्याचवेळी मी क्रिकेट थांबवण्याचं मन बनवलं होतं असं सचिनने या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. या ब्लॉगमध्ये सचिनने दोन व्हिडीओही शेअर केले आहेत. 
 

Web Title: New Year on Sachin Tendulkar's social media