स्पाईसजेटची ग्राहकांना नववर्ष भेट, ७१६ रुपयांमध्ये करा विमानप्रवास
By Admin | Updated: December 28, 2015 15:17 IST2015-12-28T13:36:23+5:302015-12-28T15:17:04+5:30
'स्पाईसजेट' कंपनीने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी 'हॅपी न्यू ईयर' सेल आणला असून त्याअंतर्गत कंपनीच्या राष्ट्रीय मार्गांवर अवघ्या ७१६ रुपयांत प्रवास करता येईल.

स्पाईसजेटची ग्राहकांना नववर्ष भेट, ७१६ रुपयांमध्ये करा विमानप्रवास
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २८ - 'स्पाईसजेट' या विमान कंपनीने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी 'हॅपी न्यू ईयर' सेल आणला असून त्याअंतर्गत कंपनीच्या काही लोकप्रिय (राष्ट्रीय) मार्गांवर अवघ्या ७१६ रुपये भरून प्रवास करता येणार आहे. मात्र त्यात कराचा समावेश नसेल. २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत ही स्कीम सुरू असून त्याअंतर्गत प्रवासी १५ जानेवारी २०१६ ते १२ एप्रिल २०१६ पर्यंतची बुकिंग्ज करू शकतात. मात्र ही योजना राष्ट्रीय मार्गावरील थेट उड्डाणांसाठीच लागू असेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहक 'स्पाईसजेट.कॉम', स्पाईसजेटचे मोबाईल अॅपसह सर्व ट्रॅव्हल कंपन्या, कॉल सेंटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे तिकीट बूकिंग करू शकतात. या योजनेअंतर्गत बुक करण्यात आलेली तिकीटे रद्द करण्यात आल्यास त्याचे पैसे ग्राहकांना परत मिळू शकतात व त्या तिकीटांचा कालावधीही बदलता येऊ शकतो, मात्र त्यासाठी चेज फी आकारण्यात येईल, असे कंपनीच्या निवेदनात नमूद करण्यात आले. 'प्रथम येणा-यास प्राधान्य' या तत्वानुसार ही तिकीट विक्री उपलब्ध असेल, असेही त्यात म्हटले आहे.
दरम्यान 'स्पाईसजेट'च्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडत असून स्पाईसजेटची वेबसाईट क्रॅश झाली आहे.