नव्या मद्यधोरणाला केरळमध्ये मान्यता
By Admin | Updated: August 28, 2014 02:44 IST2014-08-28T02:44:55+5:302014-08-28T02:44:55+5:30
पंचतारांकित दर्जाहून निम्न दर्जा असलेल्या हॉटेल्समध्ये असलेली बारची सुविधा काढून टाकण्याच्या नव्या मद्यधोरणाला केरळच्या कॅबिनेटने मान्यता दिली आहे.

नव्या मद्यधोरणाला केरळमध्ये मान्यता
तिरुवनंतपूरम : पंचतारांकित दर्जाहून निम्न दर्जा असलेल्या हॉटेल्समध्ये असलेली बारची सुविधा काढून टाकण्याच्या नव्या मद्यधोरणाला केरळच्या कॅबिनेटने मान्यता दिली आहे. मात्र मंत्रिमंडळाने बीअर बार, वाईन पार्लर व दारूची विक्री करणाऱ्या क्लब्जला दिल्या जाणाऱ्या परवान्याशी संबंधित मुद्यांवर निर्णय देण्याचे टाळले.
मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी पत्रकारांशी बोलताना, बीअर बार, वाईन पार्लर व मद्यविक्री करणाऱ्या क्लब्जच्या परवान्याशी संबंधित मुद्यांसह अन्य काही मुद्दे या नव्या धोरणात सामील केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत चर्चा होणार असून सत्तारूढ यूडीएफ सरकारने सुमारे ७३० बार बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चांडी यांनी दिली. (वृत्तसंस्था)