शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Congress पक्षात नवं टेन्शन! शशी थरूर यांच्या वक्तव्यानं वाद वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 17:30 IST

या घटनेसंदर्भात काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शशी थरूर यांनी, हे वरिष्ठ नेत्यांसाठी अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

केरळमध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पक्षाचे दिग्गज नेते के. मुरलीधरन (K. Muralidharan) यांना वायकोम सत्याग्रहावर बोलण्याची संधी न दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेसंदर्भात काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शशी थरूर यांनी, हे वरिष्ठ नेत्यांसाठी अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

थरूर म्हणाले, जर काँग्रेसला योग्य पद्धतीने पुढे वाटचाल करायची असेल, तर वरिष्ठ नेत्यांसोबत अशा पद्धतीचा व्यवहार योग्य नाही. काँग्रेस खासदार थरूर म्हणाले, मुरलीधरन हे वरिष्ठ नेते आहेत. ते केपीसीसीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. अशा वरिष्ठ व्यक्तीचा अपमान योग्य नाही.

शशी थरूर यांच्या वक्तव्याने वाद वाढला! - काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचे पुत्र मुरलीधरन यांनी कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने नाराजी व्यक्त केली. के. मुरलीधरन म्हणाले, त्यांच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले. रमेश चेन्नीथला आणि एम. एम. हासन या दोन केपीसीसीच्या माजी अध्यक्षांना बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र त्यांना संधी दिली गेली नाही. यानंतर या प्रकरणावर थरूर यांनी भाष्य केले आहे.

मुरलीधरन म्हणाले ही मोठी गोष्ट आहे -याशिवाय, आपले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि केपीसीसीचे अध्यक्ष के. सुधाकरन यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाले आहे. जर पक्षाला आपल्या सेवेची गरज नसेल, तर ते सांगू शकतात, असेही आपण त्यांना सांगितल्याचे मुरलीधरन यांनी म्हटले आहे.

मुरलीधरन यांना का दिली नाही संधी? -यातच, चेन्नीथला म्हणाले, या गोष्टीचा मुद्दा बनविण्याची आवश्यकता नाही. कारण पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना तातडीने जायचे असल्याने के. मुरलीधरन यांना संधी मिळाली नसावी.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसkarlaकार्ला