शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
5
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
6
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
7
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
9
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
10
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
11
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
12
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
13
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
14
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
15
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
16
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
17
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
18
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
19
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
20
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पोहोचण्यासाठी पश्चिम रेल्वे बनवणार नवं स्टेशन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 9:26 AM

नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली देशातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.

ठळक मुद्दे देशातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.पर्यटकांना रेल्वेच्या माध्यमातून पोहोचता यावं, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन नव्या स्टेशनचं निर्माण करणार 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’पासूनच्या पाच किलोमीटर अंतरावर केवडिया या स्टेशनची निर्मिती करण्यात येणार

गुजरातः नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली देशातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पर्यटकांना रेल्वेच्या माध्यमातून पोहोचता यावं, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन नव्या स्टेशनचं निर्माण करणार आहे. जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा विराजमान आहे. तिकडे पर्यटकांना पोहोचण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावर केवडिया या स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. हे रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 15 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन करणार आहेत. यादरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित राहणार आहेत. केवडिया रेल्वे स्टेशन निर्माणासाठी जवळपास 20 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. या रेल्वे स्टेशनचं काम सप्टेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वे डभोई आणि चांदोद स्टेशनांदरम्यानच्या 18 किलोमीटर लाइनचा विस्तार करत आहे. त्यानंतर त्याची पुढील लाइन 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या केवडियापर्यंत वाढवण्यात येणार आहे.केवडिया स्टेशनची इमारत तीन मजली असणार आहे. पहिल्या दोन मजल्यांवर रेल्वे संबंधित सुविधा पुरवण्यात येणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर एक आर्ट गॅलरी बनवण्यात येणार आहे. या गॅलरीमध्ये स्थानिक आदिवासी जाती यांची कला आणि शिल्पकला प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीrailwayरेल्वेRamnath Kovindरामनाथ कोविंदpiyush goyalपीयुष गोयल