शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

RBI आणतेय १०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार; अशी असतील खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 14:37 IST

New 100 Rs. note: लवकरच तुमच्या खिशामध्ये १०० रुपयांची झगमगती नोट दिसण्याची शक्यता आहे.

 नवी दिल्ली - लवकरच तुमच्या खिशामध्ये १०० रुपयांची झगमगती नोट दिसण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ही नोट फाटू शकणार नाहीत. तसेच तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिल्यास ती पाण्यात भिजणारही नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १०० रुपयांच्या वॉर्निक लावलेल्या नोटा चलनात आणण्याची तयारी केली आहे. आरबीआय़ अशा एक अब्ज नोटा छापणार आहे. नोटांना टिकाऊ आणि सुरक्षित बनवणे हा वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणण्यामागचा हेतू आहे. मात्र सध्यातरी केवळ प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जातील. हा प्रयोग यशस्वी ठरल्यावर हळूहळू वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणल्या जातील आणि जुन्या नोटा व्यवहारातून बाद केल्या जातील. रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. सध्या चलनामध्ये जांभळ्या रंगाच्या १०० रुपयांच्या नोटा आहेत. आता आरबीआय़ वॉर्निश लावले्या १०० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. या नोटा सुद्धा जांभळ्या रंगाच्या असतील. या नोटांचं मुख्य वैशिष्ट्य असेल ते म्हणजे त्या कुठल्याही प्रकारे खराब होणार नाहीत. अनेकवेळा मोडून चुरगळल्यावरही या नोटा फाटणार किंवा कापणार नाहीत. तसेच वॉर्निश पेंट केलेला असल्याने त्या पाण्यात भिजणार नाहीत. सध्या चलनात असलेल्या नोटा या लवकर खराब होतात. या नोटासुद्धा महात्मा गांधी सिरीजमधीलच असतील. त्यांची डिझाईन १०० रुपयांच्या नव्या नोटेप्रमाणेच असेल. वॉर्निश लावलेल्या नव्या नोटा सध्याच्या नोटांपेक्षा दुप्पट टिकाऊ असतील. १०० रुपयांच्या नोटेचा सरासरी कालावधी अडीच ते तीन वर्षांचा असतो. मात्र या नव्या नोटा सुमारे साडेसात वर्षे टिकतील. केंद्र सरकारनेभारतीय रिझर्व्ह बँकेला १०० रुपयांच्या वॉर्निश लावलेल्या एक अब्ज नोटा छापण्यास मान्यता दिली आहे. गतवर्षी वित्तराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली होती.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार