कैलास मानस सरोवर यात्रेसाठी नवा मार्ग
By Admin | Updated: October 17, 2014 23:59 IST2014-10-17T23:59:22+5:302014-10-17T23:59:22+5:30
चीनमधील भारतीय राजदूत के. के. कांता तिबेटच्या दौ:यावर असून, या भेटीनंतर कैलास मानस सरोवर यात्रेसाठी भारतीय यात्रेकरूंना नवा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन चालू केले आहे.

कैलास मानस सरोवर यात्रेसाठी नवा मार्ग
बीजिंग : चीनमधील भारतीय राजदूत के. के. कांता तिबेटच्या दौ:यावर असून, या भेटीनंतर कैलास मानस सरोवर यात्रेसाठी भारतीय यात्रेकरूंना नवा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन चालू केले आहे. हा मार्ग सिक्कीममधून असेल, चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांनी भारत दौ:यात या मार्गाला मान्यता दिली आहे.
नथुला खिंडीमार्गे जाणारा हा मार्ग अवलंबल्यास यात्रेकरूंचे कष्ट मोठय़ा प्रमाणावर कमी होतील, असे भारतीय राजदूत के. के. कांता यांनी म्हटले आहे. भारतीय अधिका:यांसह कांता यांनी क्वींघाई प्रांतातील गोलमुड शहराला भेट दिली असून, शनिवारी तेथून रेल्वेने ते ल्हासा या तिबेटच्या राजधानीत जाणार आहेत. ल्हासातील अधिका:यांची भेट घेऊन ते कैलास मानस सरोवर यात्रेस जातील.