राजस्थानमधील पाली जिल्ह्यात विकासकामांतर्गत बांधण्यात आलेला रस्ता अवघ्या सात दिवसांतच खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा रस्ता खचून झालेल्या अपघातात एक टँकर खड्ड्यात अडकला. तर एका महिलेच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना चंडावल गावातील असून, येथे अचानक रस्ता खचल्याने पाण्याचा एक टँकर सुमारे आठ फूट खोल खड्ड्यात अडकला.
या अपघातानंतर रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता आणि जुन्या पाईपलाईनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा खड्डा पण्यामागचं कारण रस्त्याखालून गेलेलं गटार हे असल्याचं सांगण्यात येत आहे. चंडावल गावातील प्रभाग क्रमांक १ मध्ये आमदार निधीमधून सुमारे ५ लाख रुपये खर्च करून रस्त्याचं काम करण्यात आलं होते. मात्र काही दिवसांतच हा रस्ता खचला. तसेच तिथे सुमारे ८ फूट खोल खड्डा तयार झाला.
रस्ता खचला तेव्हा एक पाण्याचा टँकर तिथून जात होता. हा टँकर या खचलेल्या रस्त्यामुळे तयार झलेल्या खड्ड्यामध्ये पडला. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. याचदरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या चौथऱ्यावर बसलेली एक ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी होऊन तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या महिलेला तिच्या नातेवाईकांनी उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, या रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. बांधकाम करताना बराच हलगर्जीपणा केला गेला. रस्ता बांधण्यापूर्वी जुन्या रस्त्याचा राडारोडा हटवला गेला नाही. तसेच खडीही घालण्यात आली नाही. तसेच रोलर किंवा व्हायब्रेटरचा वापरही करण्यात आला नाही. दुय्यम सामुग्री वापरून केवळ तीन ते चार इंच जाडीमध्ये रस्ता बांधण्यात आला. त्यामुळे हा रस्ता केवळ सात दिवसांमध्येच खचला, असा आरोप करण्यात येत आहे. त्याशिवाय रस्त्याखाली सुमारे ४० वर्षे जुनी पाईपलाईन असल्याने दबावामुळे ती फुटून रस्ता खचला असा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे.
Web Summary : In Rajasthan's Pali, a newly constructed road collapsed within a week. A tanker fell into the eight-foot crater, injuring a woman. Poor construction quality and old pipelines are suspected causes. Locals allege substandard materials and neglected procedures led to the road's failure.
Web Summary : राजस्थान के पाली में, एक नई सड़क एक सप्ताह के भीतर ही धँस गई। एक टैंकर आठ फुट के गड्ढे में गिर गया, जिससे एक महिला घायल हो गई। घटिया निर्माण गुणवत्ता और पुरानी पाइपलाइनों के कारण होने का संदेह है। स्थानीय लोगों का आरोप है कि घटिया सामग्री और लापरवाही से सड़क विफल हो गई।