शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीचं कारण देऊन बाबा राम रहीमच्या तावडीतून सुटका करायच्या साध्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:37 IST

एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

नवी दिल्ली, दि. 13 - एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, प्रत्येक दिवशी राम रहीमबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गुरमीत राम रहीमविरोधात करण्यात येणारे काही आरोप हे गंभीर स्वरुपातील आहेत. पूर्वी डेरातच राहणा-या एका साध्वीनं मंगळवारी एका टीव्ही चॅनेलसोबत केलेल्या बातचितदरम्यान असा गौप्यस्फोट केला आहे की, राम रहीम आवडत्या मुलींना रोज रात्री 11 वाजता आपल्या गुहेत बोलवायचा. पीडित मुलगीदेखील या गुहेत एके रात्री गेली होती, मात्र मासिक पाळीचं कारण देत कशीबशी राम रहीमच्या तावडीतून सुटका केल्याचं तिनं सांगितले.  

या साध्वीनं अशीही माहिती दिली की, राम रहीमच्या बोलवण्यावरुन मुली गुहेत तर जायच्या, मात्र परत येण्यास असहाय्य असल्याने त्या तोंडातून 'ब्र' देखील काढू शकत नव्हत्या. गुहेत जाणा-या मुलींना धमकावण्यात यायचे. जर तुम्ही राम रहीमची इच्छा पूर्ण केली नाही तर तुमच्या नातेवाईकांना जीवे मारण्यात येईल, अशा पद्धतीनं मुलींना घाबरवण्यात यायचे. एकेकाळी डेराशी संबंध असलेल्या या साध्वीनंही एका रात्री तिलाही राम रहीमच्या गुहेत पाठवण्यात आल्याची माहिती सांगितली. गुहेत गेल्यानंतर राम रहीमच्या घाणरेड्या हेतूची कल्पना आल्यानंतर तिनं मासिक पाळीचं कारण दिलं व बाबाच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली. राम रहीमची शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डेरातील साध्वी अनेकदा मासिक पाळीचं कारणं देऊन स्वतःची सुटका करत असत, असेही या साध्वीनं सांगितले आहे.  

'शाळा-अनाथ आश्रमातील मुलींचा बलात्कार'डेराचा पूर्वीचा अनुयायी गुरदास सिंह तूर यांनी असा आरोप केला आहे की, गुरमीत राम रहीम डेराच्या शाळा व अनाथ आश्रमातील मुलींवर बलात्कार करायचा. डेराच्याच हॉस्पिटलमध्ये या पीडित मुलींचा गर्भपातही केला जायचा. गुरदास यांनी सांगितले की, जेव्हा ते डेराचे सदस्य होते तेव्हा तीन गर्भवती मुलींचा त्यांच्यासमोर गर्भपात करण्यात आला.  शिवाय, बाबा राम रहीम ऑस्ट्रेलियातून सेक्सची औषधं मागवायचा, अशी माहितीही काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 

बाबा राम रहीमसंदर्भातील 10 खळबळजनक खुलासे1. कोर्टात न्यायाधिशांनी राम रहीमला बलात्काराबाबत विचारणा केली असता मी नपुंसक आहे, मी बलात्कार कसा करू शकतो असं राम रहीमकडून सांगण्यात आलं.      2. राम रहीमची प्रकृती खराब होत आहे कारण ते सेक्स एडिक्ट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते ऑस्ट्रेलियाहून सेक्ससाठी औषधं मागवायचे असा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे.  3. हनीप्रीत राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मात्र, बलात्काराच्या आरोपात बाबा तुरूंगात गेल्यानंतर राम रहीमचे हनीप्रीत सोबतच जवळचे संबंध असल्याचा खुलासा झाला आहे.5. राम रहीमवर  जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याविरोधात राम रहीमविरोधात कोर्टात केस सुरू आहे. 6. कोर्टाच्या आदेशानुसार डे-याची झाडाझडती घेतल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. बाबाच्या डे-यात गर्भपात सेंटर देखील मिळालं आहे. 7. या दरम्यान राम रहीमची गुहा देखील ब-याच चर्चेत राहिली. डे-यात अशाप्रकारचे अनेक सुरंग असून ते थेट बाबाच्या बेडरूमजवळ निघतात असाही खुलासा झाला आहे.  8. राम रहीम आपल्या डे-यात स्वतःचं प्लॅस्टिकचं चलन वापरत होता. डे-यामध्ये प्लॅस्टिकचं चलन घ्यावं लागत होतं.  9. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोर्टातून राम रहीमला पळवून नेण्याचा कट होता. दत्तक मुलगी हनीप्रीतसोबत तो पळून जाणार होता असाही खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत.  10. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. हनीप्रीतकडे असलेली एक लाल बॅग म्हणजे हिंसा भडकावण्याचा इशारा होता असाही खुलासा आता झाला आहे.  

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीम