नवी दिल्ली : राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने गुरुवारी पक्ष संघटनात्मक निवडणुकीचा नवा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडला जाईल.काँग्रेसने प्रथमच दोन टप्प्यात संघटनात्मक निवडणुका घेण्याचे ठरविले आहे. गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, केरळ आणि काही ईशान्य राज्यांसह एकूण १८ राज्यांमधील पहिल्या टप्प्यात ३१ जुलैपर्यंत निवडणुका घेण्यात येतील, तर दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, झारखंड, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि तेलंगण या राज्यांत निवडणुका होतील. सोनिया गांधी सर्वाधिक काळ पक्षाध्यक्षपदावर राहणाऱ्या नेत्या बनल्या आहेत. त्या १९९८ पासून पक्षाध्यक्षपदी आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यांची निवडणूक २१ ते ३० सप्टेंबरदरम्यान होईल. राहुल गांधी उपाध्यक्ष आहेत. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष बनविण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. ह्य२१ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रदेशाध्यक्ष, अन्य पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
३० सप्टेंबरला ‘काँग्रेस’ निवडणार नवा अध्यक्ष
By admin | Updated: March 27, 2015 01:35 IST