शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

ऑगस्टअखेर काँग्रेसमध्ये नवीन अध्यक्ष? या मराठी नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 6:06 AM

दोन वेगवेगळ्या गटांची राहुल गांधी, प्रियांका गांधींना पसंती

ठळक मुद्देमिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी नकार दिल्यास अध्यक्षपदासाठी निवडणूक होणे निश्चित आहे.

शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसला ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत नवा अध्यक्ष मिळवण्यासाठी पक्षाच्या अत्यंत वरिष्ठ पातळीवर विचार सुरू झाला आहे.  उच्चपदस्थ सूत्रांनुसार, नेते राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी यासाठी त्यांचे मन वळविण्याची जोरदार तयारी त्यांचे समर्थक करीत आहेत. दुसरीकडे पक्षाचे इतर मोठे नेेते अध्यक्षपदासाठी निवडणूक होवो किंवा अध्यक्षपदाची जबाबदारी प्रियंका गांधी यांना दिली जावी यावर अडून बसले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी नकार दिल्यास अध्यक्षपदासाठी निवडणूक होणे निश्चित आहे.  बहुतांश नेते (त्यात ग्रुप २३ चे नेतेही समाविष्ट आहेत) प्रियंका गांधी यांना अध्यक्ष बनविले जाण्यास सहमत आहेत. त्यांची भूमिका अशी की, पंजाब आणि राजस्थानमधील पेचप्रसंग सोडविण्यासाठी प्रियंका गांधी ज्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत, त्यातून त्यांची राजकीय समज दिसते. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकींसाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, “निवडणूक घेण्याचा कार्यक्रम प्रस्ताव अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला गेला आहे. आता कार्य समितीला हे ठरवायचे आहे की, निवडणूक कोणत्या तारखेला घ्यायची. जी तारीख ठरवली जाईल, त्यानंतर ४५ दिवसांचा अवधी पाहिजे.”  संकेत असेही आहेत, की अध्यक्षपदासाठीच नाही तर कार्य समितीच्या सदस्यांसाठीही निवडणूक होईल. या निवडणुकीची मागणी ग्रुप २३ प्रदीर्घ काळपासून करीत आहे.

पाच नावांचीही चर्चाअध्यक्षपदासाठी ज्या नावांची चर्चा आहे, त्यात गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंह, कमल नाथ, सुशील कुमार शिंदे आणि अशोक गेहलोत यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे