शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वेतन नियमामुळे हातात येणार कमी पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 05:58 IST

ऑक्टोबरपासून होणार लागू : भत्ते कमी होणार असल्यामुळे कराचा बोजाही वाढणार

ठळक मुद्देवेतनधारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एकूण वेतनास ‘कॉस्ट टू कंपनी’ (सीटीसी) असे म्हणतात. यात मूळ वेतन आणि भत्ते असे दोन मुख्य भाग असतात. यातील अनेक भत्त्यांवर कर्मचाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत मिळते

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : येत्या ऑक्टोबरपासून लागू होणार असलेल्या नव्या वेतन संहितेमुळे (न्यू वेज कोड) अनेक जणांच्या हातात पडणाऱ्या वेतनात (टेक होम सॅलरी) कपात होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच वेतनधारी कर्मचाऱ्यांवरील कराचा बोजाही वाढणार आहे.

वेतनधारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एकूण वेतनास ‘कॉस्ट टू कंपनी’ (सीटीसी) असे म्हणतात. यात मूळ वेतन आणि भत्ते असे दोन मुख्य भाग असतात. यातील अनेक भत्त्यांवर कर्मचाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत मिळते. सध्या कंपन्या मूळ वेतन २५ ते ३० टक्के ठेवून भत्त्यांचे प्रमाण ७० ते ७५ टक्के ठेवतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी करसवलत मिळते. मात्र नव्या वेतन संहितेत भत्ते हे एकूण वेतनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नयेत, असा नियम करण्यात आला आहे. उदा. एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन ५० हजार असेल, तर त्याचे मूळ वेतन २५ हजार राहील तसेच सर्व भत्ते २५ हजारांत गुंडाळले जातील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लागणारा प्राप्तिकर वाढून हातात पडणारे वेतन कमी होईल. याशिवाय, मूळ वेतन वाढल्यामुळे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युईटीमध्ये होणारी कपात वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा निवृत्ती निधी वाढेल; पण आज हातात पडणारे वेतन कमी होईल.

असे कमी होईल वेतन...nसमजा एका कर्मचाऱ्याचे वेतन (सीटीसी) १ लाख रुपये आहे. त्याचे मूळ वेतन ३० हजार आहे. कर्मचारी आणि कंपनी यांचे १२-१२ टक्के योगदान पीएफमध्ये जाते. त्यानुसार प्रत्येकी ३,६०० रुपये या हिशेबाने दोघांचे ७,२०० रुपये पीएफ योगदान म्हणून कपात होतात आणि कर्मचाऱ्याच्या हातात ९२,८०० रुपये पडतात. nनव्या वेतन संहितेत मूळ वेतन ५० हजार होईल. त्यामुळे पीएफमधील योगदान वाढून प्रत्येकी ६,००० होईल. दोघांचे मिळून १२ हजार रुपये पीएफमध्ये जातील आणि कर्मचाऱ्याच्या हातात ८८,००० रुपये पडतील.nयाचाच अर्थ आताच्या तुलनेत कर्मचाऱ्याचे वेतन ४,८०० रुपयांनी कमी होईल. त्याचवेळी करसवलत असलेल्या भत्त्यात कपात झाल्यामुळे प्राप्तिकर वाढेल. त्याचा वेगळा फटका कर्मचाऱ्यांना बसणारच आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकProvident Fundभविष्य निर्वाह निधी