गडहिंग्लजला नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:07+5:302017-01-31T02:06:07+5:30

The new office bearers of Gadhinglaj are felicitated | गडहिंग्लजला नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

गडहिंग्लजला नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

>गडहिंग्लज :
गडहिंग्लज पालिकेच्या नूतन पदाधिकार्‍यांचा येथील राजर्षि शाहू सामाजिक सेवा संस्थेतर्फे सत्कार पार पडला. अध्यक्षस्थानी रवींद्र महाडीक होते.
नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांचा डॉ. स्वाती कमल यांच्याहस्ते, बांधकाम सभापती क्रांतीदेवी शिवणे यांचा अनुराधा गुंजाटी यांच्याहस्ते, महिला व बालकल्याण सभापती शशीकला पाटील यांचा पुष्पा घुगरी यांच्याहस्ते, उपसभापती वीणा कापसे यांचा मंगला लिंगोजी यांच्याहस्ते, नगरसेविका रेश्मा कांबळे यांचा महादेवी पाटील यांच्याहस्ते तर नगरसेवक उदय पाटील यांचा उपाध्यक्ष महेश कुर्डेकर यांच्याहस्ते, गंगाधर हिरेमठ यांचा दीपक वेर्णेकर यांच्याहस्ते सत्कार झाला.
यावेळी प्रा. शिवमूर्ती जोडगुद्री, मल्लिकार्जून लिंगोजी, चंद्रशेखर प्रसादे, हणमंत साठे आदींसह नागरिक उपस्थित होते. संस्थाध्यक्ष एम. के. सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रतिभा सुर्वे यांनी सूत्रसंचलन केले. श्रीनिवास वेर्णेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The new office bearers of Gadhinglaj are felicitated